6.5 इंचाची मोठी स्क्रीन आणि मीडियाटेक हीलियो प्रोसेसरसह लॉन्च झाला हा स्वस्त स्मार्टफोन, चायनीज ब्रँड्सना मिळेल टक्कर

टेक कंपनी HTC ने पुन्हा एकदा जागतिक मोबाईल बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन सादर केला आहे. हा नवीन फोन कंपनीने अपनी HTC Wildfire सीरीज मध्ये HTC Wildfire E3 नावाने सादर केला आहे. याआधी कंपनीने गेल्या महिन्यात HTC Wildfire E Lite सादर केला होता. ई3 लाइट प्रमाणे ई3 पण एचटीसीने लो बजेट सेगमेंट मध्ये आणला आहे. कंपनीने हा फोन सध्या फक्त रशियात लॉन्च केला आहे. दुसर्‍या देशांमध्ये फोनच्या लॉन्च बद्दल अजूनतरी कोणतीही माहिती समोर आली नाही. येत्या काही दिवसांत हा फोन भारतीय बाजारात पण उपलब्ध होईल, असे बोलले जात आहे, पण कंपनीने कोणताही माहिती दिली नाही.

HTC Wildfire E3 चे स्पेसिफिकेशन्स
HTC च्या या फोनमध्ये 720×1560 पिक्सल रिजोल्यूशनसह 6.51-इंचाचा आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच प्रोसेसरबद्दल बोलायचे झाले तर फोनमध्ये मीडियाटेक हीलियो P22 चिपसेट आहे. चिपसेटसोबतच फोनमध्ये 64जीबी आणि 128जीबी इंटरनल स्टोरेज ऑप्शनसह फोन मध्ये 4जीबी रॅम देण्यात आला आहे. तसेच पॉलीकार्बोनेट बॉडीसह सादर करण्यात आलेल्या एचटीसी डिवाइसचे डायमेंशन 165.7 x 76.57 x 8 मिमी आणि वजन 186 ग्राम आहे.

फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये एलईडी फ्लॅशसह क्वॉड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या सेटअप मध्ये 13 मेगापिक्सलच्या प्राइमरी सेंसरसह एक 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड ऐंगल लेंस, एक 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि एक 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. इतकेच नव्हे तर फोनचा कॅमेरा 1080 पिक्सलची विडियो रेकॉर्डिंग करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोनमध्ये 13 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे.

HTC Wildfire E3 मध्ये पावर बॅकअपसाठी 4000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. ही बॅटरी 10 वॉटच्या चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटी ऑप्शन म्हणून फोनमध्ये ड्यूल सिम-सपोर्ट, 4G VoLTE, वाई-फाई, ब्लूटूथ 4.2, यूएसबी-C, 3.5mm हेडफोन जॅक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट सारखे ऑप्शन देण्यात आले आहेत. हा फोन एंडरॉयड 10 ओएस वर काम करतो.

किंमत आणि उपलब्धता
HTC Wildfire E3 ची किंमत रशियात 150 यूरो (जवळपास 13,000 रुपये) आहे. हा ब्लू आणि ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये सादर करण्यात आला आहे. रशियाबाहेर स्मार्टफोनच्या उपलब्धतेबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here