चीनी कंपन्यांना टक्कर देईल HTC चा हा स्वस्त स्मार्टफोन, 4000एमएएच बॅटरी आणि 4जीबी रॅम सह झाला लॉन्च

प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

HTC ची गेल्या महिन्यात टेक विश्वात चर्चा रंगली होती जेव्हा कंपनीचा एक नवीन फोन गूगल प्ले कंसोल वर समोर आला होता. या फोनचे नाव HTC Wildfire E2 होते, ज्याचे अनेक महत्वाचे स्पेसिफिकेशन्स लिस्टिंग मध्ये लीक झाले होते. भारतीय स्मार्टफोन यूजर्सना पण आशा होती कि हि तैवानी कंपनी लवकरच भारतात एखादा नवीन फोन लॉन्च करेल, ज्यामुळे चीनी कंपन्यांना पर्याय उपलब्ध होईल. आता बातमी समोर येत आहे कि एचटीसी ने चुपचाप आपला हा नवीन फोन HTC Wildfire E2 स्मार्टफोन मार्केट मध्ये लॉन्च केला आहे.

HTC Wildfire E2 कंपनीने ग्लोबल मार्केट मध्ये लॉन्च केला आहे. हा फोन सध्या रशियन बाजारात आला आहे जो येत्या काही दिवसांत भारतीय बाजारात पण येऊ शकतो. रशिया मध्ये एचटीसी चा हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च झाला आहे जो 4 जीबी रॅमला सपोर्ट करतो. या फोन मध्ये 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे जी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल. किंमत पाहता एचटीसी वाइल्डफायर ई2 RUB 8,760 मध्ये लॉन्च केला गेला आहे जे भारतीय करंसीनुसार 8,900 रुपयांच्या आसपास आहेत.

HTC Wildfire E2

एचटीसी वाइल्डफायर ई2 च्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल बोलायचे तर हा फोन वॉटरड्रॉप नॉच वर सादर केला गेला आहे ज्यात स्क्रीनच्या तीन कडा बेजल लेस आहेत पण खाली रुंद चिन पार्ट देण्यात आला आहे. कंपनीने हा फोन 1520 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.22 इंचाच्या आईपीएस एचडी+ डिस्प्लेवर लॉन्च केला गेला आहे. HTC फोनचा हा डिस्प्ले 320डीपीआई ला सपोर्ट करतो.

HTC Wildfire E2 कंपनीने एंडरॉयड 10 वर सादर केला आहे जो कंपनीच्या यूजर इंटरफेस सह चालतो. तसेच प्रोसेसिंगसाठी या फोन मध्ये मीडियाटेकचा हीलियो पी22 चिपसेट आहे. ग्राफिक्ससाठी फोन मध्ये पावरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. 4 जीबी रॅम व 64 जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोन मध्ये मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एचटीसी वाइल्डफायर ई2 डुअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो जो फोनच्या बॅक पॅनल वर उजवीकडे वर्टिकल शेप मध्ये आहे. या कॅमेरा सेटअपच्या खाली एलईडी फ्लॅश लाईट आहे. HTC Wildfire E2 मध्ये एफ/2.2 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे ज्या सोबत 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

HTC Wildfire E2 डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीई ला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी इथे फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअपसाठी हा फोन 4,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. फोन यूएसबी टाईप सी पोर्ट द्वारे चार्ज केला जाऊ शकतो. एचटीसी वाइल्डफायर ई2 चे डायमेंशन 158.4 x 75.9 x 8.95एमएम आहेत तर फोनचे वजन 173.5 ग्राम आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here