6जीबी रॅम, अल्ट्रापिक्सल डुअल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 845 सह लॉन्च झाला एचटीसी चा दमदार स्मार्टफोन यू12 प्लस, बघा स्पेसिफिकेशन्स

खुप दिवसांपासून टेक जगात चर्चा चालू होती की एचटीसी कंपनी आपल्या यू सीरीज मध्ये लवकरच नवीन ​​फ्लॅगशिप डिवाईस आणणार आहे. आज कंपनी ने आपल्या नवीन हाईएंड डिवाईस ‘यू12+’ अंर्तराष्ट्रीय मंचावर सादर केला आहे. एचटीसी यू12+ आता ग्लोबल मंचावर आॅफिशियल झाला आहे जो येणार्‍या काही दिवसांमध्ये भारता सह वेगवेगळ्या बाजारांत येईल. चला बघुया एचटीसी चा हाईएंड फ्लॅगशिप डिवाईस.

एचटीसी यू12+ ट्रेंड मध्ये असलेल्या बेजल लेस डिस्प्ले सह सादर करण्यात आले आहे या फोन मध्ये 2,880 x 1,440 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6-इंचाची मोठी सुपर एलसीडी स्क्रीन देण्यात आली आहे जी कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे. हा फोन एंंडरॉयड आधारित एचटीसी सेंस यूआई सह सादर करण्यात आला आहे सोबत हा क्वालकॉम च्या सर्वात पावरफुल चिपसेट स्नॅपड्रॅगन 845 वर चालतो. तर ग्राफिक्स साठी या फोन मध्ये ऐड्रेनो 630 जीपीयू पण आहे.

कंपनी ने या फोन मध्ये 6जीबी ची दमदार रॅम मेमरी दिली आहे. एचटीसी ने आपला हा हाईएंड डिवाईस दोन स्टोरेज वेरिएंट मध्ये सादर केला आहे जे 64जीबी व 128जीबी ची इंटरनल मेमरी ला सपोर्ट करतात. फोटोग्राफी सेग्मेंट पाहता फोन च्या बॅक पॅनल वर डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे जो 12-मेगापिक्सल अल्ट्रापिक्सल 4 तसेच 16-मेगापिक्सल च्या कॅमेरा सेंसर ला सपोर्ट करतो. तर सेल्फी साठी फोन मध्ये 8-मेगापिक्सल चा फ्रंट कॅमेरा आहे. फोन च्या कॅमेरा सेंसर मध्ये एआई टेक्निक आहे तसेच एआर स्टीकर फीचर ला सपोर्ट करतो.

एचटीसी यू12+ स्मार्टफोन पण आपल्या यू सीरीज च्या जुन्या स्मार्टफोन प्रमाणे स्क्वीज फीचर सह येतो. कपंनी ने हा फोन आईपी68 रेटिंग सह सादर केला आहे. ज्यामुळे हा धूळ आणि पाण्या पासून वाचतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर सह या फोन च्या बॅक पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. तर पावर बॅकअप साठी या फोन मध्ये 3,500एमएएच ची बॅटरी आहे जी क्वीक चार्ज 3.0 टेक्निक सह येते.

किंमत पाहता अंर्तराष्ट्रीय बाजारात एचटीसी यू12+ चा 64जीबी स्टोरेज वेरिएंट 799 यूएस डॉलर किंमतीत लॉन्च करण्यात आला आहे तर फोन च्या 128जीबी मेमरी वेरिएंट चे मूल्य 899 यूएस डॉलर आहे. भारतीय करंसी नुसार ही किंमत क्रमश: 54600 रुपये तसेच 61,400 रुपये असेल. एचटीसी यू12+ ब्लॅक व रेड कलर मध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन भारतात कधी येईल याविषयी काही माहिती मिळाली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here