HTC Desire 21 Pro 5G झाला लाॅन्च, 5000एमएएच बॅटरी आणि 8 जीबी रॅम पावर सह देईल चीनी ब्रँडना टक्कर

साल 2021 टेक विश्वात 5G स्मार्टफोन्सच्या विस्तारासाठी ओळखला जाईल. जवळपास प्रत्येक मोबाईल ब्रँड व टेक कंपनी बाजारात 5जी कनेक्टिविटी असलेले आपले स्मार्टफोन घेऊन येत आहे. या लिस्ट मध्ये आज अजून एक नवे नाव HTC चे जोडले गेले आहे. एचटीसीने अंर्तराष्ट्रीय बाजारात आपला प्रोडक्ट पोर्टफोलियो वाढवत नवीन स्मार्टफोन HTC Desire 21 Pro 5G लाॅन्च केला आहे. शानदार लुक आणि पावरफुल स्पेसिफिकेशन्स असलेला हा स्मार्टफोन सध्या तैवान मध्ये लाॅन्च झाला आहे जो आगामी काही दिवसांत इतर बाजारांमध्ये येईल.

HTC Desire 21 Pro 5G

एचटीसी डिजायर 21प्रो 5जी कंपनीने पंच-होल डिस्प्ले डिजाईन वर सादर करण्यात आला आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 2400 × 1080 पिक्सल रेज्ल्यूशन असलेल्या 6.7 इंचाच्या फुलएचडी+ एलसीडी डिस्प्लेला सपोर्ट करतो. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालतो. एचटीसीच्या या नवीन फोनचे डायमेंशन 167.1×78.1×9.4एमएम आणि वजन 205ग्राम आहे.

HTC Desire 21 Pro 5G एंडरॉयड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो आक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 690जी चिपसेट वर चालतो. क्वाॅलकाॅमचा हा चिपसेट 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो. तैवान मध्ये हा फोन 8 जीबी रॅम सह लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोन मेमरी माइक्रोएसडी कार्डने वाढवता येईल.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एचटीसी डिजायर 21प्रो 5जी क्वॉड रियर कॅमेर्‍याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. तसेच हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 8 मेगापिक्सलच्या अल्ट्रा-वाइड एंगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा थर्ड सेंसर आणि तेवढ्याच अपर्चरच्या 2 मेगापिक्सलच्या इतर लेंसला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी फोन मध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

HTC Desire 21 Pro 5G एक डुअल सिम फोन आहे जो 5जी आणि 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबत सिक्योरिटीसाठी फोनच्या साईड पॅनल वर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचरला सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी HTC Desire 21 Pro मध्ये 18 वाॅट फास्ट चार्जिंग टेक्नोलॉजी असलेली 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

HTC Desire 21 Pro 5G तैवान मध्ये TWD 11,990 मध्ये लॉन्च केला गेला आहे. ही किंमत भारतीय करंसीनुसार 30,000 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीने हा फोन Star Blue आणि Fantasy Purple कलर मध्ये बाजारात आला आहे. हा फोन भारतीय बाजारात लॉन्च होईल की नाही याची ठोस माहिती मिळाली नाही, त्यामुळे फोनच्या इंडिया लाॅन्च बद्दल काही सांगता येत नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here