5,000एमएएच बॅटरी आणि 48 एमपी क्वॉड कॅमेऱ्यासह HTC Desire 20 Plus लॉन्च, चीनी कंपन्यांना देईल आव्हान

HTC ने ऑगस्ट मध्ये टेक बाजारात आपला पावरफुल स्मार्टफोन HTC Desire 20 Pro लॉन्च केला होता. मोठा डिस्प्ले आणि ताकदवान रॅम असलेल्या या स्मार्टफोन नंतर आता एचटीसीने या सीरीज मध्ये अजून एक नवीन फोन जोडला आहे. तैवानी कंपनी एचटीसीने यावेळी आपला फोन HTC Desire 20+ नावाने सादर केला आहे. एचटीसी डिजायर 20प्लस सध्या कंपनीच्या होम मार्केट मध्ये बाजारातच लॉन्च केला गेला आहे जो येत्या काही दिवसांत जगातील इतर बाजारांमध्ये येईल.

HTC Desire 20+

एचटीसी डिजायर 20प्लस कंपनीने वॉटरड्रॉप नॉच डिजाईन वर सादर केला आहे. हा फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वर लॉन्च झाला आहे जो 1600 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन वाली 6.5 इंचाच्या आईपीएस एलसीडी एचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनचे डायमेंशन 164.9 x 75.7 x 9एमएम आणि वजन 203 ग्राम आहे.

HTC Desire 20 Plus अँड्रॉइड 10 ओएस वर लॉन्च केला गेला आहे जो अक्टा-कोर प्रोसेसर सह क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट वर चालतो. तैवान मध्ये हा फोन 6 जीबी रॅम वर लॉन्च झाला आहे जो 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. फोनची मेमरी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते.

फोटोग्राफी सेग्मेंट पाहता एचटीसी डिजायर 20+ क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एलईडी फ्लॅश सह एफ/1.8 अपर्चर असलेला 48 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर हा फोन 5 मेगापिक्सलच्या अल्ट्रावाइड अँगल लेंस, 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो लेंस आणि 5 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसरला सपोर्ट करतो. तसेच सेल्फीसाठी HTC Desire 20+ मध्ये एफ/2.0 अपर्चर असलेला 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

एचटीसी डिजायर 20 प्लस एक डुअल सिम फोन आहे जो 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो. 3.5एमएम जॅक आणि इतर बेसिक कनेक्टिविटी फीचर्स सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच फोन फेस अनलॉक फीचरला पण सपोर्ट करतो. तसेच पावर बॅकअपसाठी HTC Desire 20+ मध्ये क्विक चार्ज 4.0 रॅपिड चार्जिंग टेक्नोलॉजी असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

किंमत

HTC Desire 20+ तैवान मध्ये TWD 8,490 मध्ये लॉन्च केला गेला आहे. हि किंमत भारतीय करंसीनुसार 21,500 रुपयांच्या आसपास आहे. कंपनीने हा फोन Dawn Orange आणि Twilight Black कलर मध्ये बाजारात आणला आहे. हा फोन भारतीय बाजारात लॉन्च होईल कि नाही याबाबत कोणतीही ठोस माहिती मिळाली नाही. एचटीसी कडून माहिती मिळताच वाचकांना माहिती दिली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here