सर्व जियो यूजर्ससाठी हि ट्रिक आहे मोठ्या कामाची

इंडियन टेलीकॉम बाजारात जर ​आज कम किंमतीत इंटरनेट डेटा आणि मोफत वॉयस कॉल मिळत आहेत तर याचे श्रेय रिलायंस जियोलाच जाते. जियोच्या फ्री सर्विस नंतरच त्यांना टक्कर देण्यासाठी इत्तर टेलीकॉम कंपन्या पण खूप कमी किंमतीत भरपूर सर्विसेज देत आहेत. जियोच्या अनेक स्वस्त सेवा असतानाही कंपनीबद्दल तक्रारी येत असतात कि जियोचे नेटवर्क कमी येते आणि कॉल ड्रॉप सारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. जियो ग्राहक ज्यांना अशी समस्या येत आहे, त्यांना आम्ही आज असा उपाय सांगणार आहोत कि कशाप्रकारे जियो नंबर वर कोणत्याही अडचणी विना किंवा कॉल ड्रॉप विना बोलता येते.

जियो मोफत 4जी वोएलटीई कॉल देत आहे. जर तुमच्याकडे वोएलटीई इनेबल स्मार्टफोन असेल तर तुम्ही कॉल ड्रॉप किंवा नेटवर्कच्या समस्येविना जियो नंबर वरील कॉल वर बोलू शकता.

4जी वोएलटीई स्मार्टफोन मध्ये जर तुम्ही जियो नंबर वापरत असाल आणि तुमचा स्मार्टफोन डुअल सिम असेल तर जियो नंबर वर येणारे कॉल दुसऱ्या सिम नेटवर्क वर रिसीव केले जाऊ शकतात.

यासाठी तुम्हाला तुमच्या जियो नंबर वर कॉल डायवर्ट किंवा कॉल फॉरवर्ड इनेबल करावा लागेल. हि सर्विस जियो नंबर वर सुरु करून स्मार्टफोन मधील दुसऱ्या सिम नेटवर्क वर जियो नंबरचा कॉल रिसीव केला जाऊ शकतो आणि तेही अगदी मोफत. यासाठी :

शाओमी रेडमी नोट 7 आणि नोट 7 प्रो, इंडिया लॉन्चच्या आधीच जाणून घ्या फोनची संपूर्ण माहिती

जियो नंबर वरून दुसऱ्या नंबर वर कॉल फारवर्ड (अनकंडिशनल) करण्यासाठी आपल्या जियो नंबर वरून *401* डायल करा. या फीचर मुळे जियो नंबर वर येणार कॉल आपोआप दुसऱ्या नंबर वर येईल आणि दुसऱ्या ऑपरेटरच्या नटवर्क सिग्नल वरून तुमचे बोलणे होईल.

कॉल फारवर्ड (नो आन्सर) आपल्या फोन मध्ये ए​क्टिवेट करण्यासाठी जियो नंबर वरून *403* डायल करा. या फीचर मध्ये तो कॉल जियो नंबर वरून फारवर्ड होईल ज्याची रिंग वाजल्यावरही तुम्ही उत्तर देणार नाही.

जर जियो नंबर वरून एखाद्याशी बोलत असाल किंवा समोरील व्यक्तिला तुमचा नंबर बीजी येत असेल तर अशावेळी जियो नंबर वर येणारे कॉल आपोआप दुसऱ्या नंबर वर डायवर्ट होतील. यासाठी तुम्हाला *405* डायल करावा लागेल.

जर तुमच्या जियो नंबर वर कोणाला कॉल कारण्याइतकाही नेटवर्क नसेल, किंवा तुमचा जियो नंबर नॉट रिचेबल येत असेल तर अशावेळी *409* डायल करा. यात नॉट रिचेबल असतानाही जियो नंबर वाटली वॉयस कॉल तुमच्या दुसऱ्या नंबर वर येतील आणि तुम्ही कोणत्याही अडचणी विना बोलु शकाल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here