आॅनर 8एक्स आणि 8एक्स मॅक्स लॉन्च, मोठी स्क्रीन, मोठी बॅटरी आणि वॉटर ड्रॉप नॉच सह

काही दिवसांपूर्वी चर्चा चालू होती की हुआवई ब्रँड आॅनर लवकरच 8एक्स मॉडेल सादर करणार आहे आणि काल कंपनी ने हा फोन जगासमोर ठेवला आहे. सर्वात खास बाब म्हणजे कंपनी ने आॅनर 8एक्स सोबत आॅनर 8 मॅक्स पण लॉन्च केला आहे. नावावरुन स्पष्ट होते की मॅक्स ला कंपनी ने मोठ्या स्क्रीन सह सादर केले आहे आणि इतर स्पेसिफिकेशन मध्ये पण थोडा फरक असेल. या फोन्सच्या भारत लॉन्च बद्दल कंपनी ने अजूनतरी कोणतीही माहिती दिली नाही पण आशा आहे की काही दिवसांत हे फोन्स उपलब्ध होतील.

आॅनर 8एक्स चे स्पेसिफिकेशन पाहता या फोन मध्ये 6.5-इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे. कंपनी ने हा फुल एचडी प्लस डिस्प्ले सह सादर केला आहे. फोनचे स्क्रीन रेजल्यूशन 2,340 x 1,080 पिक्सल आहे. विशेष म्हणजे यात तुम्हाल 19:9 आसपेक्ट रेशियो वाला नॉच डिस्प्ले मिळेल ज्याला कंपनी ने पर्ल डिस्प्ले नाव दिले आहे.

आॅनर 8एक्स हुआवई च्या नवीन किरीन 710 ​चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी आणि 6जीबी रॅम देण्यात आला आहे या सोबत तीन स्टोरेज वेरियंट आहे. 4जीबी रॅम सह 64जीबी मेमरी आहे तर 6जीबी मध्ये 64जीबी आणि 128जीबी ची स्टोरेज मिळेल. सोबत 400 जीबी पर्यंतचा मेमरी कार्ड सपोर्ट आहे.

फोटोग्राफी साठी फोन मध्ये 20-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सल चा डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. कंपनी ने हा एफ/1.8 अपर्चर सह दिला आहे. तसेच फ्रंट मध्ये तुम्हाला 16-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा सेटअप मिळेल. कॅमेरा सह तुम्हाला एआई इंटीग्रेशन मिळेल. हा फोन एंडरॉयड इमोशन यूआई वर चालतो जो एंडरॉयड आॅपरेटिंग सिस्टम 8.1 वर आधारित आहे. पावर बॅकअप साठी फोन मध्ये 3,750एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

आॅनर 8एक्स मॅक्स मध्ये 7.12-इंचाची फुल एचडी+ स्क्रीन आहे जी 2244×1080 पिक्सल सह उपलब्ध आहे. यात पण छोटी वाटर ड्रॉप नॉच मिळेल. पावर बॅकअप साठी 5,000 एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे जी फास्ट चा​र्जला सपोर्ट करते.

हा फोन क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 636 चिपसेट वर चालतो आणि यात 4जीबी रॅम मेमरी देण्यात आली आहे. तसेच कंपनी ने माहिती दिली आहे की याचा एक मॉडेल स्नॅपड्रॅगन 660 चिपसेट सह उपलब्ध होईल ज्यात 6जीबी मेमरी असेल. हा फोन ऑक्टोबर मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

फोटोग्राफी साठी आॅनर 8एक्स मॅक्स मध्ये 16-मेगापिक्सल + 2-मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आहे आणि हा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे. तसेच 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा एफ/2.0 अपर्चर सह उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here