आॅनर 8सी लॉन्च, हा आहे जगातील पहिला फोन जो स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट वर चालेल

टेक कंपनी आॅनर ने काल अंर्तराष्ट्रीय मंचावरून आपला नवीन स्मार्टफोन आॅनर 8सी आॅफिशियल केला आहे. आॅनर 8सी क्वालकॉम च्या लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 632 वर सादर झाला आहे आणि तसेच आॅनर 8सी स्नॅपड्रॅगन 632 चिपसेट वर लॉन्च होणार जगातील पहिला स्मार्टफोन बनला आहे. कंपनी ने आॅनर 8सी दोन स्टोरेज वेरिंएट मध्ये सादर करण्यात आला ज्याची बेस किंमत भारतीय कंरसी अनुसार जवळपास 11,900 रुपये आहे.

आॅनर 8सी चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहता हा फोन पण ट्रेंड मधील नॉच डिस्प्ले सह सादर करण्यात आला आहे. या फोन मध्ये 720 x 1,520 पिक्सल रेज्ल्यूशन वाला 6.26-इंचाचा फुलव्यू आईपीएस डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनच्या फ्रंट पॅनल वर खालच्या बाजूला बॉडी पार्ट वर आॅनर लिहिण्यात आले आहे तसेच इतर तिन्ही बाजू पूर्णपणे बेजल लेस आहेत. आॅनर 8सी कंपनी द्वारा ईएमयूआई 8.1 सह एंडरॉयड 8.1 ओरियो वर सादर करण्यात आला आहे.

आॅनर 8सी मधील क्वालकॉम चा लेटेस्ट चिपसेट स्नॅपड्रॅगन 632 14एनएम टेक्नोलॉजी वर चालतो. तसेच ग्राफिक्स साठी यात ऐड्रेनो 506 आहे. कंपनी ने हा फोन 4जीबी रॅम मेमरी सह लॉन्च करण्यात आला आहे जो 32जीबी स्टोरेज आणि 64जीबी इंटरनल मेमरी सहा सेल साठी उपलब्ध होईल. दोन्ही वेरिएंट्स मध्ये फोनची स्टोरेज माइक्रोएसडी कार्ड ने 256जीबी पर्यंत वाढवता येईल.

फोटोग्राफी सेगमेंट पाहता आॅनर 8सी डुअल रियर कॅमेरा ला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर वाला 13-मेगापिक्सलचा प्राइमरी आणि एफ/2.4 अपर्चर वाला 2-मेगापिक्सलचा सेकेंडी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी साठी हा फोन एफ/2.0 अपर्चर वाल्या 8-मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक तसेच फ्रंट दोन्ही पॅनल वर फ्लॅश लाईट आहे.

आॅनर 8सी डुअल सिम फोन आहे जो 4जी ला सपोर्ट करतो. सिक्योरिटी साठी फोनच्या बॅक पॅनल वर फिंगर​प्रिंट सेंसर देण्यात आला आहे तसेच पावर बॅकअप साठी हा फोन 4,000एमएएच बॅटरीला सपोर्ट करतो. आॅनर 8सी 16 ऑक्टोबर पासून चीन मध्ये आॅरोरा ब्लॅक, प्लॅटिनम गोल्ड, मीडनाइट ब्लॅकआणि नेबूला पर्पल कलर वेरिएंट मध्ये सेल साठी उपलब्ध होईल. आॅनर 8सी के 32जीबी मेमरी वेरिएंटची किंमत 1099 युआन (जवळपास 11,900 रुपये) ठेवण्यात आली आहे तर फोनचा 64जीबी वेरिएंट 1399 युआन (जवळपास 15,000 रुपये) मध्ये सेल साठी उपलब्ध होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here