Home बातम्या एक्सक्लूसिव : रियलमी 2 मध्ये असेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13-एमपी+2-एमपी चा रियर कॅमेरा

एक्सक्लूसिव : रियलमी 2 मध्ये असेल 4,230एमएएच बॅटरी आणि 13-एमपी+2-एमपी चा रियर कॅमेरा

ओपो च्या सब-ब्रांड रियलमी ने मे महिन्यात भारतीय टेक बाजारात एंट्री करत रियलमी 1 स्मार्टफोन लॉन्च केला होता. तसेच गेल्या आठवड्यात माहिती मिळाली होती की कंपनी आता या फोन चा सेकंड जेनरेशन रियलमी 2 पण घेऊन येत आहे. रियलमी 2 बद्दल आज सकाळी कंपनी ने आपल्या ट्वीटर हँडल वरून ट्वीट करून सांगितले की रियलमी 2 लवकरच येणार आहे. कंपनी ने आपल्या ट्वीट मध्ये फोनची लॉन्च डेट किंवा फोन च्या स्पेसिफिकेशन्सचा उल्लेख केला नाही, पण 91मोबाईल्सच्या टीम ने फोनच्या महत्वाच्या स्पेसिफिकेशन्स ची माहिती मिळवली आहे.

रियलमी 2 ची सर्वात मोठी खासियत फोन मधील नॉच डिस्प्ले आणि याचा डुअल रियर कॅमेरा आहे जो फोनला रियलमी 1 पेक्षा एडवांस आहे. रियलमी 1 मध्ये एकच बॅक कॅमेरा होता तर रियलमी 2 मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. 91मोबाइल्‍स ने सूत्रांकडून कन्फर्म ​केले आहे की रियलमी 2 च्या बॅक पॅनल वरील रियर कॅमेरा सेटअप मधील एक कॅमेरा सेंसर 13-मेगापिक्सल चा असेल तर दुसरा कॅमेरा सेंसर 2-मेगापिक्सलचा असेल ज्यात डेफ्थ सेंसिंग टेक्नोलॉजी असेल.

कॅमेरा सोबत फोनचा पावर सोर्स म्हणजे याच्या बॅटरी ची माहिती आमच्या टीमला मिळाली आहे. रियलमी 2 स्मार्टफोन मध्ये कंपनी 4,230एमएएच ची मोठी बॅटरी देईल जी फोनला जास्त बॅकअप देईल. तसेच काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या रियलमी 2 च्या फोटो वरून समजले आहे की हा फोन पण रियलमी 1 प्रमाणे डायमंड ग्लास डिजाइन मध्ये सादर केला जाईल. फोनची बॉडी ग्लासची आहे तर याची फ्रेम मेटल ची वाटते आहे.

रियलमी 1 मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर नव्हता पण यावेळी कंपनी ने रियलमी2 मध्ये हा दिला आहे. जो मागच्या पॅनल वर ओवल शेप मध्ये आहे. आम्हाला माहिती मिळाली आहे की कपंनी हा फोन पण मीड बजेट मध्ये येईल तसेच देशात याची किंमत 15,000 रुपयांपेक्षा कमी असेल आणि कंपनी हा फोन ऑगस्ट च्या शेवटी किंवा सप्टेंबर च्या पहिल्या आठवड्यात सेल साठी आणू शकते.

रियलमी संबधीत माहिती मिळाली आहे की कपंनी साल 2018-19 मध्ये भारतात 3 ते 4 स्मार्टफोन लॉन्च करेल. रियलमी च्या या सर्व स्मार्टफोन्सची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी ठेवण्यात आली आहे. हे फोन 5,000 रुपयांपासून 20,000 रुपयांपर्यंत असतिल. म्हणजे कंपनी लो बजेट वाले स्वस्त फोन पण आणेल आणि ताकदवान स्पेसिफिकेशन्स वाले मीड बजेट फोन पण लॉन्च करेल.

फोन बद्दल आता पर्यंत मिळालेल्या माहितीनुसार हा मीडियाटेक हेलियो पी60 चिपसेट वर चालेल. तर कंपनी हा तीन मॉडेल मध्ये सादर करू शकते जसा रियलमी 1 आला होता. रियलमी 2 चे अन्य स्पेसिफिकेशन्स लॉन्च संबंधी माहिती तुम्हाला लवकरच देण्यात येईल.

साभार : केशव खेडा