इंटरनेट वर सोनी, स्टार आणि झी ला मागे टाकणार दूरदर्शन, देख भाई देख आणि इतर अनेक सीरीयल्स ऑनलाइन प्लॅटफॉर्म वर येणार

इंटरनेट आणि केबल (डीटीएच) येण्याआधी टीवी वर फक्त दूरदर्शनचे राज्य होते. 90 च्या दशक पाहिलेल्यांना माहिती असेलच दूरदर्शन महत्व किती होते ते. पण आजकालच्या पिढीला दूरदर्शनचा खरा अर्थ माहित नसेल.

साल 1959 मध्ये दूरदर्शनची स्थापना झाली होती. आता 59 वर्षानंतर असे वाटत आहे कि दूरदर्शन वरील अविस्मरणीय कार्यक्रम पुन्हा आपल्या भेटीला येऊ शकतात. दूरदर्शन ने ‘हम लोग’ नंतर एकपेक्षा एक मालिका प्रेक्षकांना दिल्या. यात बुनियाद, कथा सागर, एक कहानी, ये जो है जिंदगी, वागले की दुनिया, मालगुडी डेज, करमचंद, खानदान, भारत एक खोज, कहां गए वो लोग, चुनौती, श्रीकांत, कर्मभूमि, अड़ोस-पड़ोस, कक्काजी कहीन, मिर्जा ग़ालिब, नुक्कड़, तमस, उड़ान, जीवन रेखा, रजनी, आणि चंद्रकांता अशा मालिकांचा समावेश आहे.

आता ओवर-द एयर (ओटीटी) प्लॅटफॉर्म च्या मदतीने या मालिका बघता येतील. दूरदर्शन आपला डिजिटल प्लॅटफॉर्म बनवण्याची योजना बनवत आहे. जेणेकरून दूरदर्शनचा कंटेंट संपूर्ण जगासाठी उपलब्ध होईल. प्रसार भारती आणि दूरदर्शन च्या सीईओ सुप्रिया साहु ने आईएएनएस ला याबद्दल माहिती दिली आहे कि ते आपल्या प्रेक्षकांसाठी एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म सादर करू शकतात .

त्या म्हणाल्या “आमच्याकडे भरपूर कंटेंट आहे आणि भारत अनके लोक आमचे कार्यक्रम भागात मोठे झाले आहेत. त्यामुळे अशाप्रकारचा प्लॅटफॉर्म वापरून प्रेक्षकांना आनंद देता येई का याचा विचार आम्ही करत आहोत. अनेक बाबतीत आज टीवी चा छोटा पडदा भारतीय सिनेमाच्या मोठ्या पडद्या पेक्षा पण पुढे गेला आहे. आज देशात दूरदर्शनचे 23 चॅनल्स आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here