Doctor G OTT Release: पोट धरून हसायला लावणारा आयुष्मानचा ‘हा’ हिट चित्रपट आता येतोय ओटीटीवर

आयुष्मान खुरानाचा कॉमेडी चित्रपट ‘डॉक्टर जी’ मोठ्या पडद्यावर दर्शकांचे मनोरंजन केल्यानंतर आता ओटीटीवर रिलीज होण्यासाठी तयार आहे. जर तुम्ही देखील मोठ्या पडद्यावर हा चित्रपट पाहू शकला नसाल तर आता तुम्ही ओटीटीवरून घर बसल्या या धमाल चित्रपटाची मजा घेऊ शकता. ‘डॉक्टर जी’ मध्ये आयुष्मान खुराना, रकुलप्रीत सिंह आणि शेफाली शाह यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात आयुष्मान खुराना एका पुरुष स्त्रीरोगतज्ञाच्या भूमिकेत आहे.

या ओटीटीवर येतोय Doctor G

आयुष्मान खुरानाचा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज होईल. अशी माहिती Netflix नं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे दिली आहे. या पोस्टमध्ये कॅप्शन देण्यात आलं की, ‘डॉक्टरांना ??‍⚕️ देखील अशा समस्यांचा सामना करावा लागतो ज्याचे उपाय त्यांच्याकडेही नसतात! डॉक्टर जी 11 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर येत आहे!’ म्हणजे हा चित्रपट 11 डिसेंबरपासून स्ट्रीम करता येईल. हे देखील वाचा: एकच नंबर! 9 हजारांच्या आत आला Vivo Y02; शानदार लूकसह 5000mAh ची दमदार बॅटरी

स्त्रीरोगतज्ज्ञ बनला आयुष्मान

तुम्हाला माहित आहे की जवळपास सर्वच चित्रपाटांमध्ये आयुष्मान खुराना एक हटके भूमिका करून चाहत्यांना खुश करतो आणि तेच काम त्याने या चित्रपटात देखील केलं आहे. सामाजिक संदेश देण्यासोबतच हा चित्रपट दर्शकांना हसवतोही. या चित्रपटात Ayushmann Khurrana डॉ. उदय गुप्ता नावाच्या एका मेडिकल स्टूडेंटच्या भूमिकेत आहे ज्याला ऑर्थोपेडिक सर्जन बनायचं आहे. परंतु परिस्थितीमुळे त्याला मनाविरुद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ विभागात प्रवेश घ्यावा लागतो.

इथे पाहा चित्रपटाचा ट्रेलर

महिला एका पुरुष गायनोकॉलजिस्टचा सहज स्वीकार करत नाहीत, म्हणजे त्यांना उदय गुप्ता कडून उपचार करवून घ्यायचे नसतात. तसेच उदय गुप्ताला देखील या क्षेत्रात रस नसल्यामुळे गोंधळ आणखी वाढतो. याबाबतीत महिला डॉक्टर्स आणि स्टाफ कशाप्रकारे त्याला मदत करतात याची ही गोष्ट आहे. शेफाली शाह आणि रकुलप्रीत यांनी महिला डॉक्टरांची भूमिका साकारली आहे. हे देखील वाचा: अत्यंत कमी किंमतीत येतोय Redmi 12C; रियलमी-सॅमसंगची धाकधूक वाढली

फॅन्सना आवडला डॉक्टर जी

‘डॉक्टर जी’ 14 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये आला होता. फॅन्सना ‘डॉक्टर जी’ मध्ये आयुष्मान खुरानाचा नवा अवतार आवडला होता. चित्रपट पाहिल्यानंतर चाहत्यांनी आयुष्मान खुराना काहीही करू शकतो, अशी कौतुकाची थाप दिली होती. विशेष म्हणजे हा चित्रपट जरी सामाजिक संदेश देत असला तरी दर्शकांना कंटाळा येत नाही तर उलट त्यातून मनोरंजन होते. याआधी आयुष्मान Gay तरुणाच्या भूमिकेत Shubh Mangal Zyada Saavdhan या चित्रपटात दिसला होता. तर यंदा आलेल्या “अनेक” नावाच्या चित्रपटातून त्याने एका सिक्रेट एजेंटची भूमिका देखील बजावली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here