फक्त तीन महिन्यात भारतीयांनी विकत घेतले 490 लाख फोन, Xiaomi आहे नंबर वन तर Realme आहे सर्वात वेगवान

भारत आज जगातील सर्वात जास्त स्मार्टफोन यूजर्स असलेल्या देशांमध्ये समाविष्ट केला जातो. देशात मोबाईल यूजर्सची संख्या वेगाने वाढत आहे. भारतीय मोबाईल बाजाराशी संबंधित एक ताजा रिपोर्ट समोर आला आहे ज्यात सांगण्यात आले आहे कि साल 2019 च्या तिसरी तिमाही म्हणजे जुलै-ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये भारतात 49 मिलियन स्मार्टफोन यूनिट विकले गेले. हे आकडे कोणत्याही तिमाहीत विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोन्स मध्ये सर्वात जास्त आहेत. हैराणीची बाब म्हणजे भारतीयांनी 490 लाख स्मार्टफोन्स त्याकाळात विकत घेतले आहेत जेव्हा देशाची अर्थव्यवस्था मंदीतून जात आहे.

भारतीय स्मार्टफोन बाजाराशी संबंधित हा रिपोर्ट प्रसिद्ध रिसर्च फर्म काउंटरप्वाइंटने शेयर केला आहे. “Market Monitor” नावाच्या या रिपोर्ट मध्ये सांगण्यात आले आहे कि जुलै ते सप्टेंबर महिन्यांमध्ये भारतात 490 लाख स्मार्टफोन्सची विक्री झाली आहे. या आकड्यांची प्रमुख करणे म्हणजे स्मार्टफोन कंपन्यांनी केलेले नवीन लॉन्च, स्मार्टफोन्स वर देण्यात आलेला डिस्काउंट आणि दिवाळीच्य आधी वेगवेगळ्या शॉपिंग साइट वर आयोजित झालेला सेल असल्याचे बोलले जात आहे.

नंबर वन Xiaomi

Xiaomi ने यावेळी पण स्वतःला भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन ब्रँड म्हणून सिद्ध केले आहे. रिपोर्टनुसार 49 मिलियन यूनिटच्या या विक्री मध्ये एकट्या Xiaomi ने 26 टक्के मार्केट शेयर आपल्या नावे केला आहे. साल 2018 च्या तिसऱ्या तिमाहीच्या तुलनेत साल 2019 च्या तिसऱ्या तिमाही मध्ये Xiaomi ने 7 टक्के वाढ केली आहे. Redmi 7A, Redmi Note 7 Pro आणि Redmi Note 7S शाओमीचे सर्वात जास्त विकले जाणारे फोन ठरले आहेत.

Samsung ची स्थिती

Samsung देशातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. Samsung ने बाजारात 20 टक्के शेयर आपल्या नावे केला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी Samsung ला 4 टक्कयांचे नुकसान झाले आहे. Samsung फॅन्स साठी चांगली बातमी अशी कि यावर्षीच्या दुसऱ्या तिमाहीचे तुलनेत Samsung ने तिसऱ्या तिमाही मध्ये 3 टक्क्यांची वाढ मिळवली आहे. Samsung ची गॅलेक्सी एम सीरीज आणि गॅलेक्सी ए सीरीजचे फोन लोकांना खूप आवडले.

Realme सर्वात वेगवान

रिसर्च रिपोर्ट मध्ये खुलासा झाला आहे कि Realme भारतात सर्वात वेगाने वाढणारी टेक कंपनी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी Realme 6 पट जास्त वेगाने आपला विस्तार करत आहे. Realme चा मार्केट शेयर सध्या खूप कमी आहे पण ज्या वेगाने ते वाढत आहेत त्या हिशोबाने येत्या काळात ते इतर ब्रँड्सना मागे टाकत Xiaomi व Samsung च्या मार्केट शेयर आणि शिपमेंटला टक्कर देऊ शकतात.

Apple देशातील टॉप 10 ब्रँड्स मध्ये येत आहे. iPhone XR च्या कमी झालेल्या किंमती आणि iPhone 11 च्या लॉन्चने Apple चा सेल वाढला आहे. Oppo F11 series आणि Oppo A5s स्मार्टफोनच्या यशामुळे Oppo ची वार्षिक वाढ 12 टक्क्यांपर्यंत वाढली आहे. तर Vivo U10, Vivo Z1x आणि Vivo Z1 Pro च्या लॉन्च मुळे Vivo ने या तिमाहीत भारतात आपला आतापर्यंतचा सर्वात मोठा सेल केला आहे. OnePlus साल 2019 च्या तिसऱ्या तिमाहीत भारतातील नंबर वन प्रीमियम स्मार्टफोन ब्रँड बनला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here