हे आहेत भारतातील सर्वात स्वस्त 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेले स्मार्टफोन, किंमत फक्त 10,999 रुपयांपासून सुरु

एक काळ होता जेव्हा 64 मेगापिक्सल कॅमेऱ्याचे नाव ऐकताच 25 हजार – 30 हजार किंमत असलेले फ्लॅगशिप स्मार्टफोन्स डोक्यात येत होते. पण स्मार्टफोन बाजारात टेक्नॉलॉजी अशी बदलली आहे कि आज 64 मेगापिक्सल सारखे हाई पावर कॅमेरा स्मार्टफोन लो बजेट मध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. भारतीय बाजारात पण आता असे स्मार्टफोन्स कमी नाहीत जे 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात आणि त्यांची किंमत पण खूप कमी आहे. ऐकून कदाचित हैराणी होईल पण आता 64MP क्वॉड कॅमेरा असलेला फोन फक्त 10,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. आज आम्ही भारतीय बाजारात 5 सर्वात स्वस्त स्मार्टफोन्सचा उल्लेख केला आहे जो 64 मेगापिक्सलच्या रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतात. आम्ही हे पाचही फोन वेगवेगळ्या कंपनीचे सांगितले आहेत जेणेकरून यूजर्सना आपला ब्रँड निवडणे सोप्पे जाईल.

1.

Tecno Camon 16

देशातील सर्वात स्वस्त 64 मेगापिक्सल रियर कॅमेरा असलेल्या फोनचा खिताब टेक्नो कॅमोन 16 कडे आहे. हा फोन 10 ऑक्टोबरला भारतात लॉन्च झाला आहे ज्याची पहिली विक्री 16 ऑक्टोबर पासून होईल. हा फोन 4 जीबी रॅम मेमरी सह लॉन्च केला गेला आहे जो 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत फक्त 10,999 रुपये आहे.

कॅमेरा

Tecno Camon 16 च्या बॅक पॅनल वर चौकोनी आकाराचा रियर कॅमेरा सेटअप आहे ज्यात चार कॅमेरा सेंसर आणि एक एलईडी फ्लॅश ‘+’ शेप मध्ये आहेत. एलईडी लाईट सह हा फोन एफ/1.79 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सलच्या प्राइमरी रियर कॅमेरा लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेल्या 2 मेगापिक्सलच्या डेफ्थ सेंसर, तेवढाच अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलचा मॅक्रो लेंस आणि एका एफ/3.5 अपर्चरच्या एआय लेंसला सपोर्ट करतो. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी टेक्नो कॅमोन 16 स्मार्टफोन एफ/2.0 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या Samsung RGB S5K3P9 सेंसरला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स

Tecno Camon 16 मध्ये 1640 x 720 पिक्सल रेज्ल्यूशन असलेला 6.8 इंचाचा एचडी+ पंच-होल डिस्प्ले देण्यात आली आहे. अँड्रॉइड 10 आधारित हाईओएस 7.0 सह हा फोन मीडियाटेकच्या हीलियो जी70 चिपसेट वर चालतो. डुअल सिम आणि 4जी वोएलटीई सोबतच सिक्योरिटीसाठी फोनच्या बॅक पॅनल वर रियर फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे पावर बॅकअपसाठी Tecno Camon 16 स्मार्टफोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो.

2.

Realme 7i

रियलमी 7आय गेल्याच आठवड्यात 7 ऑक्टोबरला भारतात लॉन्च झाला जो येत्या 16 ऑक्टोबर पासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. हा फोन दोन वेरिएंट्स मध्ये लॉन्च झाला आहे. Realme 7i चा बेस वेरिएंट 4 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो ज्याची किंमत 11,999 रुपये आहे. तसेच फोनचा दुसरा वेरिएंट 4 जीबी रॅम मेमरी सह 128 जीबी इंटरनल स्टोरेज वर लॉन्च केला गेला आहे आणि या वेरिएंटची किंमत 12,999 रुपये आहे.

कॅमेरा

रियलमीचा हा नवीन फोन क्वॉड रियर कॅमेऱ्यासह लॉन्च झाला आहे. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा B&W सेंसर आहे. सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.1 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या Sony IMX471 सेंसरला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स

Realme 7i 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.5 इंचाच्या एचडी+ एलसीडी डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. फोनची स्क्रीन 90हर्ट्ज रिफ्रेश रेट वर चालते आणि कोर्निंग गोरिल्ला ग्लासने प्रोटेक्टेड आहे. हा फोन अँड्रॉइड 10 आधारित रियलमी यूआय सह 2गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर आणि 11एनएम टेक्नॉलॉजी वर बनलेल्या क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 662 चिपसेट वर चालतो. तसेच ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एड्रेनो 610 जीपीयू आहे. 4जी वोएलटीई, रियर फिंगरप्रिंट सेंसर सह हा फोन 18वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेल्या 5,000एमएएच च्या बॅटरीला सपोर्ट करतो.

3

Poco X3

पोको एक्स3 ने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात भारतीय बाजारात एंट्री घेतली होती जो देशातील सर्वात स्वस्त 64 मेगापिक्सल कॅमेरा असलेल्या फोन पैकी एक बनला होता. बाजारात हा फोन तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे ज्यात 6 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज असलेले बेस वेरिएंट 16,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच पोको एक्स3 चा 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 18,499 रुपये आणि 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज वेरिएंट 19,999 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

कॅमेरा

Poco X3 क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या सेटअप मध्ये एलईडी लाईट सह एफ/1.73 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी Sony IMX682 सेंसर देण्यात आला आहे. त्याचबरोबर बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेली 13 मेगापिक्सलची अल्ट्रावाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आणि एफ/2.4 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेंसर आहे. सेल्फीसाठी पोको एक्स3 स्मार्टफोन 20 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स

Poco X3 20:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्ले वर लॉन्च केला गेला आहे. या फोनची स्क्रीन कोर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ने प्रोटेक्टेड आहे तसेच 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते आणि डायनामिक स्वीच टेक्नॉलॉजी सह येते. अँड्रॉइड 10 सह हा फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 732G चिपसेट वर चालतो. पावर बॅकअपसाठी या फोन मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली 6,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

4.

Xioami Redmi Note 9 Pro Max

शाओमीने आपला पावरफुल फोन भारतीय बाजारात 64एमपी रियर कॅमेऱ्यासह लॉन्च केला होता जो तीन वेरिएंट्स मध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. या फोनचाय सर्वात छोट्या वेरिएंट मध्ये 6 जीबी रॅम सह 64 जीबी इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे ज्याची किंमत फक्त 16,999 रुपये आहे. तसेच फोनचा दूसरा वेरिएंट 6 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो आणि याची किंमत 18,499 रुपये आहे. फोनच्या सर्वात मोठ्या वेरिएंट मध्ये 8 जीबी रॅम + 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे जो 19,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.

कॅमेरा

Xioami Redmi Note 9 Pro Max एफ/1.89 अपर्चर असलेल्या 64 मेगापिक्सल CMOS image सेंसर असेलल्या क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनल वर एफ/2.2 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाइड अँगल लेंस, 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि 2 मेगापिक्सलचा डेफ्थ सेंसर देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि वीडियो कॉलिंगसाठी या फोन मध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा आहे.

स्पेसिफिकेशन्स

शाओमीचा हा स्मार्टफोन 20:9 आस्पेक्ट रेशियो वाली 6.67 इंचाच्या फुलएचडी+ पंच-होल डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोन मध्ये अँड्रॉइड 10 मीयूआय आहे सोबत प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगॉन 720जी चिपसेट देण्यात आला आहे. 4जी वोएलटीई आणि साईड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर सोबतच पावर बॅकअपसाठी Redmi Note 9 Pro Max मध्ये 33वॉट फास्ट चार्जिंग आणि रिवर्स चार्ज टेक्नॉलॉजी सपोर्ट असलेली 5,020एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

5.

Motorola One Fusion Plus

मोटोरोलाचा हा स्मार्टफोन पण 64 मेगापिक्सल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. भारतात हा फोन एकाच वेरिएंट मध्ये लॉन्च केला गेला आहे जो 6 जीबी रॅम सह 128 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. तसे पाहता मोटोेरोला वन फ्यूजन प्लस 16,999 रुपयांमध्ये लॉन्च केला गेला होता पण नंतर 500 रुपयांची कपात केल्यानंतर हा मोबाईल बाजारात 17,499 रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Motorola One Fusion+ क्वॉड रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोन बॅक पॅनल वर फ्लॅश लाईट सह एफ/1.8 अपर्चर असलेला 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सोबत एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड अँगल लेंस, एफ/2.4 अपर्चर असलेली 5 मेगापिक्सलची मॅक्रो लेंस आणि तेवढाच अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर आहे. सेल्फी व वीडियो कॉलिंगसाठी हा फोन एफ/2.2 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सलच्या पॉप-अप कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

स्पेसिफिकेशन्स

Motorola One Fusion+ 19.5:9 आस्पेक्ट रेशियो असलेल्या 6.5 इंचाच्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करतो. हा मोटोरोला फोन अँड्रॉइड 10 ओएस वर सादर केला गेला आहे जो 2.3गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या आक्टाकोर प्रोसेसर सह क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगॉन 730जी चिपसेट वर चालतो. ग्राफिक्ससाठी फोन मध्ये एड्रेनो जीपीयू 618 आहे. डुअल सिम व 4जी वोएलटीई सोबतच रियल फिंगरप्रिंट सेंसर तसेच 18वॉट टर्बोपवार चार्जिंग सपोर्ट असलेली 5,000एमएएच ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here