21,999 रुपयांमध्ये उपलब्ध झाला OPPO F21s Pro; फोनवर मिळतोय बँक डिस्काउंट

OPPO F21s Pro series launched in india price specifications sale details revealed

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon India वर सतत काहींना काही ऑफर्स सुरु असतात. आजही या शॉपिंग साइटवर एक जबरदस्त ऑफर सुरु आहे, जिच्या अंतर्गत ओप्पोच्या एका शानदार स्मार्टफोनवर डिस्काउंट आणि बँक ऑफर मिळत आहेत. ऑफर दरम्यान शानदार कॅमेरा असलेला स्मार्टफोन Oppo F21s Pro स्मार्टफोनवर सूट दिली जात आहे. या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर, 8GB रॅम, 64MP रियर कॅमेरा आणि 32MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. चला जाणून घेऊया Oppo F21s Pro स्मार्टफोनवर मिळणारा डिस्काउंट, ऑफर, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती.

डिस्काउंटसह OPPO F21s Pro उपलब्ध

OPPO F21s Pro स्मार्टफोनचा एकच व्हेरिएंट भारतीयांच्या भेटीला आला आहे, ज्यात कंपनीनं 8GB रॅम दिला आहे. एमआरपी 27,999 रुपये असणारा हा स्मार्टफोन सध्या अ‍ॅमेझॉनवर 21,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. म्हणजे या फोनवर 21 टक्क्यांची सूट मिळत आहे. तसेच 2000 रुपयांचा बँक डिस्काउंटनंतर हा हँडसेट 19,999 रुपयांमध्ये तुमचा होईल. हे देखील वाचा: What Is Community In WhatsApp And How To Use: व्हॉट्सअ‍ॅपचं नवीन ‘कम्यूनिटी’ फिचर म्हणजे काय? जाणून घ्या

OPPO F21s Pro स्मार्टफोन ICICI बँकेच्या कार्डनं विकत घेतल्यास 2000 रुपयांचा डिस्काउंट, सिटी युनियन बँक कार्डवर 300 रुपयांचा डिस्काउंट तर एचएसबीसी बँकेच्या कार्डवर 250 रुपयांचा डिस्काउंट टीमला जात आहे. जर तुम्ही मासिक हप्त्यांवर हा हँडसेट विकत घेण्याचा विचार करत असाल तर ईएमआय 1051 रुपयांपासून सुरु होतात. तसेच तुम्ही तुमचा जुना फोन एक्सचेंज करून अतिरिक्त सूट देखील मिळवू शकता.

OPPO F21s Pro 4G चे स्पेसिफिकेन्स

  • 6.4-इंच FHD+ 90Hz AMOLED पॅनल
  • 64MP+ 2MP + 2MP ट्रिपल रियर कॅमेरा
  • 32MP सेल्फी कॅमेरा
  • Android 12 आधारित ColorOS 12.1 ओएस
  • Qualcomm Snapdragon 680 4G
  • 4,500mAh बॅटरी, 33W SuperVooc चार्जिंग
  • 8GB RAM आणि 128GB स्टोरेज

OPPO F21s Pro 4G फोनमध्ये 6.4-इंचाचा फुल-HD+ AMOLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 90Hz आहे. हा स्मार्टफोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरसह सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 8GB RAM आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहेत. फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येते. ओप्पोचा हा स्मार्टफोन Android 12 आधारित ColorOS 12.1 वर चालतो. हे देखील वाचा: मायबोली मराठीत वापरा GPay, PhonePe, Amazon Pay आणि Paytm; अशी आहे भाषा बदल्याण्याची प्रोसेस

OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनच्या बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 64MP चा सोनी सेन्सर आहे, जोडीला 2MP चे दोन कॅमेरा सेन्सर – मायक्रोस्कोप आणि डेप्थ सेन्सर आहेत. तसेच फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. OPPO F21s Pro 4G स्मार्टफोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, जी 33W SuperVooc चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here