26 जुलैला होणाऱ्या लिलावानंतर सरकारी कंपनी BSNL ग्राहकांना 5G नेटवर्कचं सुख देणार का?

भारतात 5जी सेवा आता लाँचच्या उंबरठ्यावर आहे. या महिन्यात 26 तारखेला देशात 5G spectrum auction सुरु होणार आहेत. या लिलावात देशातील Reliance Jio, Airtel आणि Vodafone Idea या तीन बड्या खाजगी कंपन्या सहभागी होणार आहेतच परंतु अजून एका नव्या कंपनीमुळे लिलावाची रंगत वाढली आहे. आणि ती चौथी कंपनी आहे अदानी ग्रुप. अदानी ग्रुपनं मोबाईल सर्व्हिस क्षेत्रात एंट्री करणार नसल्याचं सांगितलं आहे, परंतु त्यांची कंपनी सायबर सुरक्षेसह पोर्ट आणि खाजगी नेटवर्क सोल्युशन देण्यासाठी लिलावात सहभागी होणार आहे. दरीम एक प्रश्न निर्माण होतो की या लिलावात सरकारी कंपनी BSNL सहभागी होणार का? सरकारी कंपनी देखील आपल्या पण अपने ग्राहकांना 5G चं सुख देणार का? आज आम्ही या प्रश्नांची उत्तरं या लेखात देण्याचा प्रयत्न करत आहोत.

BSNL चा 5G स्पेक्ट्रम ऑक्शनमध्ये सहभाग

5G स्पेक्ट्रमचा लिलाव या महिन्यात होणार आहे, परंतु यात फक्त प्रायव्हेट टेलीकॉम प्लेयर्स सहभागी होत आहेत. यात प्रायव्हेट टेलीकॉम कंपन्यांमध्ये Reliance Jio, Airtel, Vodafone Idea सोबतच Adani Group चा देखील समावेश आहे. परंतु BSNL 5G स्पेक्ट्रममध्ये सहभागी होणार नाही. कारण ही एक सरकारी कंपनी आहे आणि जर कंपनीनं 5जी सेवा आणली तर भारत सरकारद्वारे बीएसएनएलसाठी वेगळा स्पेक्ट्रम रिजर्व्ह ठेवण्यात आला असता. काही दिवसांपूर्वी रिपोर्ट्स समोर आले होते की BSNL नं 3300 MHz ते 3670 MHz बँड मध्ये 70MHz च्या एयरवेव्ससाठी 5G लायसन्सची मागणी केली होती. परंतु आतापर्यंत यावर सरकारकडून कोणतंही उत्तर आलं नाही. काही दिवसांपूर्वी एक बातमी मात्र आली होती की, 15 ऑगस्टला बीएसएनएल 5जी चा देखील रस्ता मोकळा होईल.

5G साठी तयार BSNL!

वर सांगितल्याप्रमाणे BSNL ऑक्शनमध्ये भाग घेणार नाही परंतु बातमी अशी आहे की कंपनी लिलावात ठरलेली किंमत देईल जेणेकरून जेव्हा त्यांना मिड-बँड स्पेक्ट्रमचा वापर करून 5G सर्व्हिस लाँच करायची असेल तेव्हा करता येईल. तसेच, BSNL 4G सर्व्हिस बिल्ट-इन 5G क्षमतेसह सादर करेल.

15 ऑगस्टला BSNL करू शकते मोठी घोषणा

BSNL च्या 5जी लाँच बद्दल आतापर्यंत फक्त एकच बातमी आली होती परंतु मोठ्याप्रमाणावर 4G ची चर्चा आहे. एका रिपोर्टनुसार, BSNL TCS सह मिळून सुरुवातीला 4G कनेक्टिव्हिटी त्या ठिकाणी लाँच करेल, जिथे जास्त महसूल असेल. 4G-रेडीचा इंफ्रास्ट्रक्चर तयार आहे आणि हा देशात रोल आउट केला जाईल. भारतात 5जी नेटवर्क नो स्टॅन्डअलोन (NSA) मोडमध्ये 15 ऑगस्टला लाँच केला जाऊ शकतो. त्यामुळे युजर्सना एन्ड-टू-एन्ड 5G नेटवर्कची 5जी सर्व्हिस दिली जाईल परंतु यात बीएसएनएलच्या समावेश असेल की नाही हे स्पष्ट झालेलं नाही.

BSNL 4G देखील आहे अपूर्ण

वर सांगितल्याप्रमाणे बीएसएनएल आणि टाटा कंसल्टंसी सर्व्हिसेज (TCS) एकत्र येऊन 4जी सेवा सादर करण्याची योजना बनवत आहेत. पहिल्यांदाच 4जी सेवेसाठी भारतीय टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. अशी माहिती BSNL चे डायरेक्टर Sushil Kumar Mishra यांनी स्वतः दिली आहे.

BSNL चा होणार फायदा?

एकेकाळी भारतात BSNL सर्वात मोठी मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी होती. परंतु कमकुवत नेटवर्क आणि 4जीकडे दुर्लक्ष केल्यामुळे ग्राहकांनी पाठ फिरवण्यास सुरुवात केली. खाजगी कंपन्यांनी सरकारी कंपनीला मागे टाकले. तसेच स्लो नेटवर्कनं देखील कंपनीचे नुकसान केले. विशेष म्हणजे कंपनीचे रिचार्ज प्लॅन खाजगी कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त किंमतीत जास्त बेनिफिट्स देतात. असेच प्लॅन 4जी आल्यानंतर देखील कायम राहिल्यास कंपनी सर्वांना मागे टाकू शकते. विशेष म्हणजे गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये खाजगी कंपन्यांनी भाववाढ केल्यापासून बीएसएनएलच्या ग्राहक संख्येत वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here