Amazon Great Indian Festival Sale: प्राइम मेंबर्ससाठी सेल सुरु; या स्मार्टफोन्सवर मिळतायत सर्वात बेस्ट डील

Best Smartphone Deals: ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर अ‍ॅन्युअल फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival Sale) सुरु झाला आहे. सध्या ही सेल अ‍ॅमेझॉन प्राइम मेंबरसाठी सुरु झाली आहे. सेल दरम्यान प्रत्येक कॅटेगरीच्या वेगवेगळ्या प्रोडक्ट जसे की– स्मार्टफोन, लॅपटॉप, टेलिव्हिजन, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक आणि अन्य प्रोडक्टवर जबरदस्त डिस्काउंट मिळत आहे. त्यामुळे जर तुम्ही देखील तुमच्यासाठी काही खरेदी करण्याची योजना बनवत असाल तर ही योग्य वेळ आहे. अ‍ॅमेझॉन (Amazon India) च्या वेबसाइटवर गेले कित्येक दिवस सेल आणि डिस्काउंटबद्दल माहिती शेयर केली जात आहे. अ‍ॅमेझॉनवर SBI च्या डेबिट आणि क्रेडिट कार्डवर 10 टक्के इंस्टंट डिस्काउंट मिळत आहे. पुढे आम्ही तुम्हाला अ‍ॅमेझॉनवरील बेस्ट स्मार्टफोन्स डील्स (Deals) बाबत सांगितलं आहे.

Amazon Great Indian Festival Sale: Best Smartphone Deals

iPhone 12

Deal Price
Apple iPhone 12 (128GB) - Blue
₹ 39999
₹ 64900 (39% off)
Buy on Amazon

iPhone 12 स्मार्टफोन अ‍ॅमेझॉन सेल दरम्यान आतापर्यंतच्या सर्वात कमी किंमतीत म्हणजे 39,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. iPhone 12 मध्ये 6.1-इंचाचा Super Retina XDR डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन A14 Bionic चिपसेटसह येतो. फोनमध्ये 12MP चा ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. हा कॅमेरा 4K Dolby Vision HDR आणि नाइट मोड, डीप फ्यूजन आणि Smart HDR 3 वर चालतो. ड्यूरेबिलिटी पाहता, iPhone 12 मध्ये क्रेमिक शील्ड बिल्ड आणि IP68 वॉटर रजिस्टेंट रेटिंग देण्यात आली आहे.

प्राइस – 60,900 रुपये
डील प्राइस – 39,999 रुपये

Samsung Galaxy S22 5G

Samsung चा फ्लॅगशिप Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनच्या सेल दरम्यान 49,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. इतर वेळी या फोनची किंमत 72,999 रुपये आहे. Samsung Galaxy S22 5G स्मार्टफोनमध्ये 6.1-इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि HDR10+ रेटिंग मिळते. फोनमध्ये 50MP चा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनमध्ये 3,700mAh ची बॅटरी आहे.

प्राइस – 72,999 रुपये
डील प्राइस – 49,999 रुपये

Samsung Galaxy M13 5G

Samsung Galaxy M13 5G स्मार्टफोन सध्या 8,499 रुपयांमध्ये डिस्काउंटसह विकला जात आहे, ज्याची मूळ किंमत 15,999 रुपये आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन सॅमसंगच्या Exynos 850 प्रोसेसरवर चालतो. फोनच्या मागे 50MP ट्रिपल कॅमेरा आहे तर फ्रंटला 8MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. यात Android 12 OS आधारित OneUI Core 4 देण्यात आला आहे. वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं एकूण 12GB रॅमची ताकद मिळवता येईल. फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.

प्राइस – 15,999 रुपये
डील प्राइस – 8,499 रुपये

Samsung Galaxy M53 5G

Samsung Galaxy M53 5G मिडरेंजमधील एक चांगला स्मार्टफोन आहे. बँक डिस्काउंटसह हा फोन 19,499 रुपयांमध्ये विकला जात आहे, याची मूळ किंमत 26,499 रुपये आहे. फोनमध्ये 6.7-इंचाचा FHD+ सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. यात Mediatek Dimensity 900 प्रोसेसरची पावर मिळते. फोनच्या मागे 108MP क्वॉड कॅमेरा सेटअप आहे, ज्यात 8MP चा अल्ट्रा वाइड सेन्सर, 2MP चा मॅक्रो आणि 2MP चा डेप्थ सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा सेल्फी शुटर मिळतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सरची सुरक्षा देण्यात आली आहे.

प्राइस – 26,499 रुपये
डील प्राइस – 19,499 रुपये

OnePlus Nord CE 2 Lite 5G

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन सध्या 18,249 रुपयांमध्ये विकला जात आहे, परंतु सेल नसल्यावर यासाठी 21,999 रुपये मोजावे लागतील. हा चांगली परफॉर्मन्स देतो आणि क्वॉलकॉमच्या लेटेस्ट 5G प्रोसेसर सह आला आहे. Oneplus Nord CE2 Lite 5G कंपनीनं काही महिन्यांपूर्वी भारतीय बाजारात सादर केला आहे. हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरवर चालतो आणि यात तुम्हाला 6GB रॅमसह 128GB स्टोरेज मिळते. फोनमध्ये 6.59 इंचाची स्क्रीन देण्यात आली आहे, जी 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करते. फोटोग्राफीसाठी या फोनमध्ये 64MP + 2MP + 2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा मिळतो. त्याचबरोबर 16MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन 5,000mAh च्या बॅटरीसह येतो.

प्राइस – 19,999 रुपये
डील प्राइस – 18,249 रुपये

Redmi A1

Redmi A1 बजेट सेगमेंटमधील बेस्ट स्मार्टफोन्स पैकी एक आहे. सेल सेल अंतर्गत याची विक्री 6,299 रुपयांमध्ये केली जात आहे, परंतु याची मूळ किंमत 6,999 रुपये आहे. रेडमी ए1 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा मोठा डिस्प्ले एचडी+ रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे . हा फोन अँड्रॉइड 12 आधारित मीयुआयवर चालतो. प्रोसेसिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलियो जी22 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत 2GB rआम आणि 32GB स्टोरेज आहे. स्मार्टफोन 8MP ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. यात 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेरा आहे. फोनमध्ये 5,000एमएएच बॅटरी मिळते.

प्राइस – 6,999 रुपये
डील प्राइस – 6,299 रुपये

Samsung Galaxy M33 5G

Samsung Galaxy M33 5G स्मार्टफोन या सेलमध्ये बँक डिस्काउंटनंतर 13,449 रुपयांमध्ये विकत घेता येईल, जो नेहमी 18,999 रुपयांमध्ये विकला जातो. हा फोन Exynos 1280 ऑक्टा कोर प्रोसेसरसह बाजारात आला आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट असलेल्या 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 च्या सुरक्षेसह देण्यात आला आहे. फोनमध्ये 50MP चा क्वॉड कॅमेरा रिअर सेटअप आणि 8MP सेल्फी कॅमेरा आहे. यातील 6,000mAh ची मोठी बॅटरी 25W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Android 12 आधारित OneUI 4 वर चालतो.

प्राइस – 18,999 रुपये
डील प्राइस – 13,449 रुपये

Redmi Note 11

Redmi Note 11 हा एक फिचर पॅक बजेट स्मार्टफोन आहे, जो नेहमी 13,999 रुपयांमध्ये विकला जातो. परंतु ऍमेझॉन सेलमध्ये याची किंमत 11,099 रुपये आहे. या फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.43-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. मागे 50MP AI क्वॉड कॅमेरा सेटअप फोटोग्राफीसाठी मिळतो. तर फ्रंटला 13MP चा सेल्फी शुटर देण्यात आला आहे. यातील 5,000mAh ची दमदार बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसरच्या मदतीनं मल्टिटास्क करतो. सोबत 6GB RAM आणि 64GB स्टोरेज आहे.

प्राइस – 13,999 रुपये
डील प्राइस – 11,099 रुपये

Redmi 10A

Redmi 10A या सेलमध्ये 7,469 रुपयांच्या जबरदस्त किंमतीत खरेदी करता येईल, अन्यथा यासाठी 9,499 रुपये मोजावे लागेल असते. फोनमध्ये Mediatek Helio G25 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. यातील 6.53-इंचाचा मोठा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. यात 4GB RAM आणि 64GB स्टोरेज मिळते, जी 512GB पर्यंत मायक्रोएसडी कार्डच्या मदतीनं वाढवता येते. रॅम देखील 5GB परंतु वर्चुअली वाढवता येतो. यातील 5,000mAh बॅटरी दिवसभर आरामात पुरेल. फोनच्या मागे 13MP चा कॅमेरा आहे तर फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

प्राइस – 9,499 रुपये
डील प्राइस – 7,469 रुपये

Redmi 9 Activ

Redmi 9 Activ मोठ्या डिस्काउंटनंतर 7,499 रुपयांमध्ये उपलब्ध झाला आहे, जो नेहमी 9,499 रुपयांमध्ये विकला जातो. Redmi 9 Active मध्ये 6.53-इंचाचा डिस्प्ले HD+ रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे. यातील Mediatek Helio G35 प्रोसेसर मल्टीटास्किंग सोपी करतो. तर HyperEngine गेम टेक्नॉलजी गेमिंगमध्ये मदत करते. फोनमध्ये 5,000mAh battery, 4GB RAM आणि 64GB स्टोरेज देण्यात आली आहे. मागे 13MP+2MP ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. तर व्हिडीओ कॉलिंगसाठी 5MP फ्रंट कॅमेरा मिळतो.

प्राइस – 9,499 रुपये
डील प्राइस – 7,499 रुपये

Samsung Galaxy M32

Samsung Galaxy M32 स्मार्टफोन या यादीतला शेवट हँडसेट आहे. नेहमी 15,499 रुपयांमध्ये मिळणार हा मॉडेल सेलमध्ये 12,499 रुपयांमध्ये विकला जात आहे. यात 90Hz रिफ्रेश रेटसह 6.4-इंचाचा सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले FHD+ रिजोल्यूशनसह देण्यात आला आहे, जो 800 नीट्स ब्राइटनेसला सपोर्ट करतो. मागे 64MP क्वॉड कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे तर फ्रंटला 20MP चा सेल्फी कॅमेरा आहे. फोनमध्ये 6,000mAh बॅटरी, 6GB RAM आणि 128GB स्टोरेज आहे. यात Android 11 आधारित OneUI मिळतो. तसेच Samsung Galaxy M32 मध्ये MediaTek Helio G80 प्रोसेसर देण्यात आला आहे.

प्राइस – 15,499 रुपये
डील प्राइस – 12,499 रुपये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here