Amazon Great Indian Festival sale: सॅमसंगच्या ह्या स्मार्टफोनवर मिळतेय बंपर सूट, जाणून घ्या किंमत

ह्या फेस्टिवल सीजनमध्ये तुम्ही तुमचा स्मार्टफोन बदलण्याचा विचार करत आहात का? तर मग सॅमसंग (Samsung) चे फोन तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन ठरू शकतात. कंपनीकडे बजेट फोनपासून फ्लॅगशिप फोन पर्यंतच्या मोठी रेंज आहेत. सध्या अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सेल (Amazon Great Indian Festival sale) मध्ये सॅमसंगच्या फोनवर तुम्हाला चांगली डील मिळेल. चला जाणून घेऊया अ‍ॅमेझॉन सेलमध्ये सॅमसंगच्या कोणत्या फोनवर कोणत्या ऑफर्स आहेत.

Samsung Galaxy M33 5G (8GB, 128GB Storage)

सॅमसंग गॅलेक्सी एम33 5जी (Samsung Galaxy M33 5G) एक चांगला मिड-रेंज स्मार्टफोन आहे. हा 6.6 इंच FHD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेटसह येतो. ह्या फोनमध्ये कंपनीनं Exynos 1280 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे, जो डेली टास्क सहज हँडल करतो. फोनमध्ये 50MP चा क्वॉड रियर कॅमेरा सेटअप आणि फ्रंटला 8MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. हा 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह येतो. फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 12 5जी बँड्सना सपोर्ट करतो.

सेलिंग प्राइस: 18,499 रुपये

डील प्राइस: 15,499 (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M13 (4GB, 64GB Storage)

सॅमसंग गॅलेक्सी एम13 (Samsung Galaxy M13) एक शानदार बजेट स्मार्टफोन आहे. हा 6.6 इंचाच्या FHD+ डिस्प्ले आणि 401 PPI सह येतो. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये 50MP+5MP+2MP चा ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे, तर फोनच्या फ्रंटला 8MP चा कॅमेरा आहे. हा 6000mAh ची मोठी बॅटरीसह आला आहे. फोनमध्ये कंपनीनं Exynos 850 प्रोसेसरचा वापर केला आहे. हा डिवाइस Samsung Knox security सह येतो.

सेलिंग प्राइस: 10,999 रुपये

डील प्राइस: 9,199 रुपये

Samsung Galaxy M13 (6GB, 128GB Storage)

सॅमसंग गॅलेक्सी एम13 (Samsung Galaxy M13) देखील बजेट स्मार्टफोन आहे. हा 6जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह येतो. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिवल सीजनमध्ये हा फोन तुम्ही स्वस्तात खरेदी करू शकाल. या फोनमध्ये 6.6-इंचाचा FHD+ डिस्प्ले आहे आणि 6000mAh ची बॅटरी मिळते. ह्यात 50MP ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये कंपनीनं Exynos 850 प्रोसेसरचा वापर केला आहे, जो डेली टास्कसाठी उत्तम आहे.

सेलिंग प्राइस: 12,999 रुपये

डील प्राइस: 11,199 रुपये

Samsung Galaxy M04 (4GB RAM, 64GB Storage)

बजेट रेंज मध्ये सॅमसंग गॅलेक्सी एम04 (Samsung Galaxy M04) पण चांगला पर्याय ठरू शकतो. हा फोन अ‍ॅमेझॉन सेलमध्ये आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. फोनमध्ये 6.5-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीनं या फोनमध्ये 5,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे म्हणजे फुल चार्जमध्ये तुम्हाला एका दिवसापेक्षा जास्त बॅटरी बॅकअप मिळतो. फोनमध्ये 13MP+2MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे, तसेच फ्रंटला 5MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये कंपनीनं MediaTek Helio P35 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. फोन 4GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह येतो.

सेलिंग प्राइस: 8,499 किंमत

डील प्राइस: 6,499 किंमत

Samsung Galaxy M04 (4GB RAM, 128GB Storage)

Samsung Galaxy M04 चा 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट देखील स्वस्तात उपलब्ध आहे. हा एक शानदार बजेट स्मार्टफोन आहे. ह्यात कंपनीनं 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले आणि 5,000mAh ची बॅटरी दिली आहे. कंपनीनं या फोनमध्ये MediaTek Helio P35 ऑक्टाकोर प्रोसेसर दिला आहे. हा फोन 13MP+2MP ड्युअल रियर कॅमेरा आणि 5MP च्या फ्रंट कॅमेऱ्यासह येतो.

सेलिंग प्राइस: 9,499 रुपये

डील प्राइस: 7,499 रुपये

Samsung Galaxy M14 5G (4GB, 128GB Storage)

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जी (Samsung Galaxy M14 5G) पावरफुल मिड रेंज डिवाइस आहे, जो 5जी सपोर्टसह येतो. कंपनीनं या फोनमध्ये Exynos 1330 ऑक्टाकोर प्रोसेसरचा वापर केला आहे. हा फोन 13 बँड पर्यंत 5G ला सपोर्ट करतो. कंपनीनं फोनमध्ये 6,000mAh ची बॅटरी दिली आहे, जी फुल चार्जमध्ये एका दिवसापेक्षा जास्त चालते. हा Android 13 OS वर आधारित One UI 5.0 वर चालतो. फोन 50MP+2MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13MP फ्रंट कॅमेऱ्यासह येतो.

सेलिंग प्राइस: 14,990 रुपये

डील प्राइस: 10,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M14 5G (6GB,128GB Storage)

सॅमसंग गॅलेक्सी एम14 5जीचा 6GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंट देखील अ‍ॅमेझॉन सेलमध्ये आकर्षक ऑफरसह उपलब्ध आहे. हा फोन 6.6-इंच FHD+ डिस्प्ले आणि 401 PPI सह येतो. फोनमध्ये कंपनीनं Exynos 1330 ऑक्टा-कोर प्रोसेसर दिला आहे. हा प्रोसेसर डेली टास्क सहज हँडल करतो. कॅमेरा फीचर पाहता, फोनमध्ये 50MP+2MP+2MP चा ट्रिपल रियरा कॅमेरा आहे, तसेच फ्रंटला 13MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. ह्यात 6,000mAh ची मोठी बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन 2 वर्षांच्या अँड्रॉइड अपग्रेड आणि 4 वर्षांच्या सिक्योरिटी अपडेटसह येतो.

सेलिंग प्राइस: 15,990 रुपये

डील प्राइस: 11,490 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M34 5G (6GB,128GB Storage)

सॅमसंग गॅलेक्सी एम34 5जी मिड रेंजमध्ये चांगला फोन आहे. हा 6.5-इंच FHD+ (120Hz) सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये कंपनीनं 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. ह्यात 50MP+8MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Exynos 1280 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो, जो 12 5G बँड्सना सपोर्ट करतो. कंपनीनं स्क्रीनवर Gorilla Glass 5 ची सुरक्षा दिली आहे. ह्या फोनसह कंपनी 4 जेनरेशन अँड्रॉइड अपग्रेड आणि 5 वर्ष पर्यंत सिक्योरिटी अपडेट देत आहे.

सेलिंग प्राइस: 19,999 रुपये

डील प्राइस: 14,499 रुपये (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M34 5G (8GB,128GB Storage)

Samsung Galaxy M34 5G चा हा व्हेरिएंट 8जीबी रॅम आणि 128जीबी स्टोरेजसह येतो. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये हा फोन देखील आकर्षक किंमतीत उपलब्ध आहे. हा फोन पण 6.5-इंच FHD+ (120Hz) सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह येतो. फोनमध्ये कंपनीनं 6,000mAh ची मोठी बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी ह्यात 50MP+8MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Exynos 1280 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो, जो 12 5G बँड्सना सपोर्ट करतो. कंपनीनं स्क्रीनवर Gorilla Glass 5 चं प्रोटेक्शन दिलं आहे. ह्या फोनसह कंपनी 4 जेनरेशन अँड्रॉइड अपग्रेड आणि 5 वर्ष पर्यंत सिक्योरिटी अपडेट देत आहे.

सेलिंग प्राइस: 21,999 रुपये

डील प्राइस: 16,499 (बँक डिस्काउंटसह)

Samsung Galaxy M34 5G (8GB,256GB Storage)

सॅमसंगच्या या फोनचा 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये अ‍ॅमेझॉन सेलमध्ये ऑफर्ससह उपलब्ध झाला आहे. या फोनमध्ये कंपनीनं 6.5-इंचाचा FHD+ (120Hz) सुपर अ‍ॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. फोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी मिळते. तसेच ह्यात 50MP+8MP+2MP ट्रिपल रियर कॅमेरा आणि 13MP चा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन Exynos 1280 ऑक्टा-कोर प्रोसेसरसह येतो, जो 12 5G बँड्सना सपोर्ट करतो. कंपनीनं स्क्रीन वर Gorilla Glass 5 चं प्रोटेक्शन दिलं आहे. ह्या फोनसह कंपनी 4 जेनरेशन अँड्रॉइड अपग्रेड आणि 5 वर्षांचे सिक्योरिटी अपडेट देते. त्याचबरोबर कंपनी Knox security देखील देत आहे.

सेलिंग प्राइस: 20,999 रुपये

डील प्राइस: 18,999 रुपये (बँक डिस्काउंटसह)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here