बाप रे! UIDAI नं रद्द केले 6 लाख Aadhaar Card, तुमचा नंबर तर नाही ना या यादीत?

आधार कार्ड (Aadhaar card) आज देशातील प्रत्येक नागरिकसाठी सर्वात आवश्यक सरकारी डॉक्यूमेंट आहे. जर तुमच्याकडे फक्त आधार कार्ड असेल तर जवळपास सर्व सरकारी व गैर-सरकारी कामांमध्ये देखील तुमची ओळख पटवून देणं सोपं जातं. परंतु, सरकारनं चेतावणी दिल्यानंतर देखील काही लोक एकापेक्षा जास्त आधार कार्डचा वापर करत आहेत. अशाप्रकारचं डुप्लिकेट आधार (Aadhaar card duplication) बाळगणाऱ्या लोकांवर सरकारकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. आधार बनवणाऱ्या सरकारी संस्था UIDAI नं अशा आधार कार्ड्सची ओळख पटवून रद्द करण्यात सुरुवात केली आहे. HT च्या रिपोर्टनुसार युआयडीएआयनं आतापर्यंत 598,999 पेक्षा जास्त डुप्लिकेट आधार कार्ड (duplicate Aadhaar card) रद्द केले आहेत.

Duplicate Aadhaar Card झाले रद्द

Duplicate Aadhaar Card रद्द करण्यात आल्याची माहिती इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना तंत्रज्ञान राज्य मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी लोकसभेत दिली. त्यांनी सांगितलं की, युआयडीएआयद्वारे डुप्लिकेट आधारावर मोठी कारवाई केली जात आहे. तसेच, आधार कार्डमध्ये एक एक्स्ट्रा व्हेरिफिकेशन फीचर आणण्यात आलं आहे, ज्यात लवकरच फेस म्हणजे चेहऱ्याचा आधार व्हेरिफिकेशनसाठी वापर केला जाईल. हे देखील वाचा: सर्वात स्वस्त OnePlus वर देखील बंपर डिस्काउंट; 8GB रॅम, 64MP आणि 5000mAh बॅटरी कमी किंमतीत

अवैध वेबसाइट्सना नोटिस

सध्या फक्त फिंगरप्रिंट आणि आयरिसच्या मदतीनं आधार व्हेरिफिकेशन होत आहे. परंतु, आगामी काळात चेहऱ्याचा वापर करून आधार व्हेरिफिकेशन होईल. हे फीचर आणण्यामागे सरकारचा उद्देश Duplicate Aadhaar Card ची समस्या कमी करण्याचा आहे. याव्यतिरिक्त मंत्री चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे की, युआयडीएआयनं फेक वेबसाईट्सना नोटिस देखील पाठवली आहे. ते म्हणले युआयडीएआयनं संबंधित वेबसाईट मालकांना कोणत्याही प्रकारची अनधिकृत सेवा देण्यापासून रोखले आहे. हे देखील वाचा: 26 जुलैला होणाऱ्या लिलावानंतर सरकारी कंपनी BSNL ग्राहकांना 5G नेटवर्कचं सुख देणार का?

असं चेक करा आधार कार्ड खरं आहे की खोटं

  • सर्वप्रथम तुम्हाला अधिकृत वेबसाईट https://resident.uidai.gov.in/aadhaarverification वर जावं लागेल.
  • या वेबसाईटवर आधार व्हेरिफिकेशन पेज ओपेन असेल, ज्यात तुम्हाला एक टेक्स्ट बॉक्स दिसेल जिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर एंटर करावा लागेल.
  • तुमचा 12 डिजिट आधार नंबर एंटर केल्यावर डिस्प्लेमध्ये दिसत असलेला कॅप्चा कोड एंटर करा.
  • त्यानंतर व्हेरिफाय बटनवर क्लिक करा. जर तुमचा आधार नंबर योग्य असेल तर एक नवीन पेज ओपन होईल ज्यात तुम्हाला तुमचा आधार नंबर दिसेल.
  • आधार नंबर व्यतिरिक्त खाली तुमची संपूर्ण माहिती देखील असेल. तसेच जर तुमचा नबंर खोटा असेल तर इनव्हॅलिड आधार नंबर असं लिहून येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here