8GB RAM सह स्वस्तात Realme 10s 5G चीनमध्ये लाँच

काही दिवसांपूर्वी रियलमी कंपनीनं आपली नवीन नंबर सीरिज जागतिक बाजारात लाँच केली होती. या Realme 10 series मध्ये सीरिजमध्ये Realme 10 4G, Realme 10 5G, Realme 10 Pro 5G आणि Realme 10 Pro+ 5G मॉडेल लाँच करण्यात आले आहेत. आता ’10’ नंबर सीरीजमध्ये Realme 10s 5G स्मार्टफोन चीनी बाजारात लाँच करण्यात आला आहे. या हँडसेटमध्ये 50 Megapixel Rear Camera, 8GB RAM + 256GB storage, MediaTek Dimensity 810 चिपसेट आणि 33W fast charging सह 5,000mAh battery मिळते. पुढे रियलमी 10एस च्या फीचर्स व स्पेसिफिकेशन्सची माहिती देण्यात आली आहे.

Realme 10s price

रियलमी 10एस स्मार्टफोन कंपनीच्या होम मार्केट चीनमध्ये दोन व्हेरिएंट्ससह लाँच झाला आहे. फोनच्या बेस व्हेरिएंटमध्ये 8जीबी रॅमसह 128जीबी स्टोरेज देण्यात आली आहे तर दुसरा व्हेरिएंट 8 जीबी रॅमसह 256 जीबी इंटरनल स्टोरेजला सपोर्ट करतो. या दोन्ही व्हेरिएंट्सची किंमत अनुक्रमे 1099 युआन आणि 1299 युआन आहे जे भारतीय करंसीनुसार 13,000 रुपये आणि 15,400 रुपयांच्या आसपास रूपांतरित होतात. हा रियलमी मोबाइल Streamer Blue आणि Crystal Black कलरमध्ये बाजारात आला आहे. हे देखील वाचा: दोन-दोन डिस्प्लेसह OPPO Find N2 Flip लाँच; सॅमसंगचं साम्राज्य संपवण्यासाठी फोल्डेबल Find N2 ची एंट्री

Realme 10s Specifications

रियलमी 10एस स्मार्टफोन 20.5:9 अ‍ॅस्पेक्ट रेशियोसह सादर करण्यात आला आहे जो 1080 x 2408 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.6 इंचाच्या फुलएचडी+ वॉटरड्रॉप नॉच डिस्प्लेला सपोर्ट करतो. या फोनची स्क्रीन आयपीएस एलसीडी पॅनलवर बनली आहे जी 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेट, 400निट्स ब्राइटनेस आणि 401पीपीआय सारख्या फीचर्सना सपोर्ट करते.

Realme 10s अँड्रॉइड 12 ओएसवर आधारित रियलमी युआय 3.0 वर चालतो. 2.4गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेल्या ऑक्टाकोर प्रोसेसरसह या मोबाइल फोनमध्ये मीडियाटेक डिमेनसिटी 810 चिपसेट देण्यात आला आहे. चायनामध्ये हा स्मार्टफोन 8 जीबी रॅमसह आला आहे जो 128जीबी स्टोरेज आणि 256 जीबी स्टोरेजला सपोर्ट करतो. हा फोन LPDDR4X RAM आणि UFS2.2 Storage टेक्नॉलॉजीसह येतो.

फोटोग्राफीसाठी रियलमी 10एस स्मार्टफोन ड्युअल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एफ/1.8 अपर्चर असलेला 50 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे जोडीला एफ/2.8 अपर्चर असलेली 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा रियलमी मोबाइल एफ/2.0 अपर्चर असलेला 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. हे देखील वाचा: बाजारात नवा ‘सेल्फी किंग’? 60MP फ्रंट कॅमेऱ्यासह शक्तिशाली Moto X40 लाँच; 10 हजारांच्या रेंजमध्ये 5G Phone लाँच

Realme 10s ड्युअल सिम फोन आहे ज्याच्या सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे तसेच हा फोन फेस अनलॉक फीचरला देखील सपोर्ट करतो. पावर बॅकअपसाठी रियलमी 10एस मध्ये 5,000एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here