सर्वात स्वस्त OnePlus वर देखील बंपर डिस्काउंट; 8GB रॅम, 64MP आणि 5000mAh बॅटरी कमी किंमतीत

ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म Amazon वर उद्या अर्थात 23 जुलैपासून Amazon prime day सेल सुरु होणार आहे. या सेलच्या आधीच अनेक प्री-सेल डील अ‍ॅमेझॉनवर लाईव्ह झाल्या आहेत. ज्यात स्मार्टफोन्ससह इतर अनेक प्रॉडक्ट्सचा समावेश आहे, जे डिस्काउंटसह विकत घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही एखादा नवीन मिडरेंज स्मार्टफोन विकत घेण्याचा विचार करत असाल तर OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन तुमच्यासाठी चांगला ऑप्शन ठरू शकतो. OnePlus च्या या स्मार्टफोनवर मिळत असलेली ऑफर, याचे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

OnePlus Nord CE 2 Lite 5G ऑफर

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनचा बेस मॉडेल भारतात 19,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. प्राईम डे सेलच्या निमित्ताने वनप्लसचा या फोनवर 4000 रुपयांची सूट मिळवता येईल. सर्वप्रथम ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डनं पेमेंट केल्यास तुम्हाला 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. तसेच जुना फोन एक्सचेंज केल्यास देखील 2000 रुपयांचा बोनस डिस्काउंट मिळेल. हे देखील वाचा: केवळ 7 पैशात 1 Km चालते Enigma R7 हायब्रीड इलेक्ट्रिक सायकल; ताशी 25 km चा टॉप स्पीड

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन भारतात दोन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आला आहे. हा फोन 128GB स्टोरेजसह 6GB रॅम आणि 8GB रॅम ऑप्शनमध्ये सादर करण्यात आला आहे. यातील बेस मॉडेलची किंमत 19,999 रुपये आहे. तर मोठा व्हेरिएंट 21,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. वनप्लसचा Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोन ब्लू टाइड आणि ब्लॅक डस्क कलरमध्ये विकत घेता येईल.

OnePlus Nord CE 2 Lite चे स्पेसिफिकेशन्स

OnePlus Nord CE 2 Lite 5G स्मार्टफोनमध्ये 6.59-इंचाचा IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+ आहे, तसेच 20:9 अस्पेक्ट रेश्यो आणि 120Hz रिफ्रेश रेट देखील देण्यात आला आहे. कंपनीनं डिस्प्लेमध्ये सेल्फी कॅमेऱ्यासाठी पंच होल कटआउट दिला आहे. ज्यात 16MP चा फ्रंट कॅमेरा फिट करण्यात आला आहे.

वनप्लसच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो, ज्याचे अपर्चर f/1.7 आहे. प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर देखील मिळतो. हे देखील वाचा: 26 जुलैला होणाऱ्या लिलावानंतर सरकारी कंपनी BSNL ग्राहकांना 5G नेटवर्कचं सुख देणार का?

वनप्लस नॉर्ड सीई 2 लाईट स्मार्टफोनमध्ये 5000 mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करते. यात Qualcomm Snapdragon 695 SoC देण्यात आली आहे. जोडीला फोनमध्ये 8GB पर्यंतचा रॅम आणि 128GB स्टोरेज आहे. वनप्लसचा हा फोन Android 12 आधारित OxygenOS 12.1 वर चालतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here