80Km रेंज आणि 360 डिग्री फोल्ड होणारी बॅटरी बाइक लाँच; पाहा प्राइस आहे का तुमच्या बजेटमध्ये

Electric Bike Launch, Price and Range: भारतीय प्रीमियम इलेक्ट्रिक सायकल ब्रँड स्विच बाइक (Svitch Bike) नं ग्राहकांना खुश करत आपली नवीन इलेक्ट्रिक बाइक LITE XE लाँच केली आहे. या बाइकमध्ये लांब रेंज सोबतच अनेक वैशिष्ट्ये आहेत, ज्यांची माहिती आम्ही पुढे दिली आहे. एयरक्राफ्ट ग्रेड अ‍ॅल्युमिनियम 6061 फ्रेमच्या मदतीनं बनवलेली ही ई-बाइक (Electric Bike) खूप हलकी आणि मजबूत असल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. विशेष म्हणजे याआधी कंपनीनं जुलैमध्ये कर्नाटकमधील बंगळुरूमध्ये झालेल्या इलेक्ट्रिक व्हेईकल एक्सपो 2022 मध्ये फोल्डिंग इलेक्ट्रिक बाइक Mxe, Xe आणि Xe+ लाँच केली होती. चला जाणून घेऊया LITE XE ची प्राइस, रेंज आणि सेलची सर्व माहिती पुढे देण्यात आली आहे.

LITE XE चा 5वा मॉडेल लाँच

Svitch च्या पोर्टफोलियोमधील LITE XE हा 5वा मॉडेल आहे. यात 4 इलेक्ट्रिक आणि एक नॉन-इलेक्ट्रिक बाइक आहे. या लिस्टमध्ये XE+, XE, MXE, NXE आणि LITE XE आहेत. LITE XE बद्दल बोलायचं झालं तर ही 5 कलर ऑप्शन स्कारलेट रेड, मिडनाइट सॅफायर, यांकी येलो, गोब्लिन ग्रीन आणि बर्लिन ग्रेमध्ये सादर करण्यात आली आहे. हे देखील वाचा: iPhone 14 वर बंपर ऑफर देत आहे जियो, इथे मिळेल सर्वात स्वस्तात हा फोन

360 डिग्री फोल्ड होते स्विच LITE XE

वर सांगितल्याप्रमाणे स्विच LITE XE बाइक पूर्णपणे फोल्ड होते. ही 360 डिग्री पर्यंत फोल्ड केली जाऊ शकते. याचा अर्थ असा की तुम्ही हिला कुठेही फोल्ड करून सहज घेऊन जाऊ शकता. तसेच स्टोर करून ठेवण्यासाठी देखील ही बाइक जास्त जागा घेत नाही, त्यामुळे शहरी भागात या बाइकची जास्त अडचण वाटणार नाही. या ई-बाइकचे हँडलबार, सीट आणि सस्पेंशन अ‍ॅडजस्ट करता येतात. हे देखील वाचा: Samsung ला जोरदार धक्का! या कंपनीनं आणला सर्वात स्वस्त Foldable Smartphone

स्विच LITE XE चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

या ई-बाइकमध्ये 36V, 250W ची मोटर देण्यात आली आहे. तसेच कंपनीनं यात 36V, 10.4 AH ची बॅटरी दिली आहे. कंपनीचा दावा आहे की ही एकदा चार्ज केल्यावर 80Km पर्यंत चालवता येते. यात एक LCD डिजिटल डिस्प्ले देखील मिळेल, ज्यात बॅटरी रेंज, किलोमीटरसह अनेक आवश्यक माहिती दाखवली जाईल. इतकेच नव्हे तर या इलेक्ट्रिक बाइकमध्ये 20×3 स्लीक टायर्स दिले जात आहेत, ज्यामुळे ई-बाइकचा लुक आणखी शानदार वाटतो. तसेच बाइकमध्ये 7 स्पीड गियर्स देण्यात आले आहेत, यात 5 PAS मोड्स (पॅडल असिस्ट सिस्टम) देखील देण्यात आला आहे. याचा अर्थ असा की बॅटरीसह ही पायानी देखील चालवता येईल.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here