2019 मध्ये फोन विकत घेण्यापूर्वी हे 5 फीचर्स नक्की बघा

जेव्हा तुम्ही एखादा फोन विकत घेता तेव्हा तुमचा प्रयत्न तो सर्वात अडवांस असावा असाच असतो. कारण टेक्नॉलॉजी जर थोडी जुनी असली तर तुम्ही सर्वांच्या मागे राहाल. त्यात मोबाईल बाजार वेगाने बदलत असतो. याचमुळे मोबाईल विश्वाबद्दल नेहमीच बोलले जाते कि इथे रजा नवीन टेक्नॉलॉजी जन्म घेते आणि दार तीन महिन्यांनी बाजार बदलतो. मोबाईल जगतात इनोवेशन आणि बदल तुम्ही स्वतः बघू शकता. 2018 च्या सुरवातीला कसे फोन येत होते आणि जेव्हा 2018 संपत आहे तेव्हा फोन्स किती बदललेले आहेत. डिजाइन मध्ये मेटलच्या ऐवजी ग्लासचा वापर होत आहे, आता रियर फिंगरप्रिंट नसून फेस अनलॉक आणि इन डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर ची मागणी आहे, कॅमेरा पण दोन हवे आहेत आणि 4जी वोएलटीई तर हवीच. असे अनेक बदल दिसले आहेत.

आता आम्ही 2019 मध्ये आलो आहोत आणि यावर्षी पण नवीन टेक्नोलॉजी येणार आहे जी फोनचा अनुभव बदलेले . जर तुम्ही नवीन वर्षात फोन्स विकत घेण्याचा विचार करत असाल तर काही गोष्टी ध्यानात ठेवा जेणेकरून जर टेक्नॉलॉजी बदलली तरीही तुम्ही काही काळ अपडेटड राहू शकाल. खाली आम्ही 2019 मध्ये फोन साठी आवश्यक असलेल्या 5 फीचर्सचा उल्लेख केला आहे.

1. 5जी

गेल्या दीड वर्षांपासून 5जी ची कुणकुण चालू आहे. तसेच देशांत हि सर्विस उपलब्ध पण झाली आहे. सध्या 5जी फोन नाहीत पण मार्च पर्यंत सॅमसंग, शाओमी आणि वनप्लस सहित अनेक कंपन्या आपले 5जी डिवाइस लॉन्च करणार आहे. राहील प्रश्न भारताचं तर 2019 मध्ये 5जी नेटवर्कचा लिलाव होणार आहे आणि यावर्षीच्या शेवटपर्यंत एयरटेल आणि रिलायंस जियो सारख्या कंपन्या आपली सर्विस लॉन्च करू शकतात. त्यामुळे जर तुम्ही 2109 मध्ये फोन ची खरेदी करणार असाल तर 5जी फोन घेण्याचा प्रयत्न करा जेणेकरून नेटवर्क लॉन्च होण्यापूर्वीच तुम्ही 5जी रेडी असाल.

2. एंडरॉयड 9 पाई

एंडरॉयड 9 पाई गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये लॉन्च झाला होता. परंतु अजूनही अनेक फोन एंडरॉयड 8.1 ओरियो वर लॉन्च होत आहेत. परंतु जर तुम्ही फोन 2019 मध्ये घेणार असाल तर एंडरॉयड ओरियो ऑपरेटिंग आधारित फोन ना घेतलेला बरे. तुम्ही 9 पाई ऑपरेटिंग सिस्टम आधारित फोन घेतला पाहिजे. कारण तुमची जुनी ऑपरेटिंग सिस्टम जरी अपडेट झाली तरी 9 पाई वर येईल. पण जर तुमचा फोन आधीच लेटेस्ट ओएस वर चालत असेल तर गूगल एंडरॉयड 10 लॉन्च करताच तो त्यावर अपडेट होऊ शकेल. अर्थात तुम्ही अप टू डेट रहाल.

3. डुअल वोएलटीई सपोर्ट

तुम्ही हाच विचार करत असाल कि एक 4जी पुरे आहे डुअल चा काय फायदा? लक्षात घ्या भारतात जास्तीत जास्त लोक डुअल सिम चा वापर करतात. एक डेटा साठी आणि एक कॉलिंग साठी. परंतु सर्विस प्रदाता कंपन्या हळू हळू आपली 2जी आणि 3जी सर्विस बंद करणार आहेत. 2जी, 3जी आणि 4जी सर्विस मुळे खर्च वाढतो आणि कंपन्या हि कॉस्ट कमी करणार आहेत.

आता त्या फक्त 4जी सेवा देतील आणि नंतर नेटवर्क 5जी वर अपग्रेड करतील. त्यामुळे जर तुमचा फोन 2जी किंवा 3जी सपोर्ट करत असेल तर त्याची सेवा बंद पण होऊ शकते. यासाठी डुअल वोएलटीई घेणे चांगले. दोन्ही नेटवर्क वर तुम्हाला क्रिस्टल क्लियर आवाज मिळेल.

4. बोके वीडियो

2018 मध्ये बोके इफेक्टअसलेल्या इमेजेजची चर्चा होती. परंतु 2019 याला एक पॉल पुढे नेणार आहे. आता बोके इफेक्ट असलेले वीडियोज चर्चेत असतील. अर्थात ब्लर बॅकग्राउंड सह तुम्ही वीडियो शूट करू शकाल. त्यामुळे जर तुम्ही 2019 मध्ये फोन विकत घेतलात तर बोके वीडियो फीचर पण नक्की बघा.

5. फास्ट चार्जिंग

नॉच, वॉटर ड्रॉप नॉच आणि पंच होल नॉच इत्यादींची चर्चा आहे जी काही दिवस कायम राहील. हे फीचर्स आता कमी किंमत असलेल्या फोन मध्ये त्यामुळे त्याविषयी जास्त विचार करू नये. पण फोन मध्ये बॅटरी मोठी होत आहे आणि ती चार्जिंग साठी खूप वेळ घेते. त्यामुळे तुम्ही 2019 मध्ये फोन विकत घेणार असाल तर फास्ट चार्जिंग नक्की बघा. हे फीचर वेळेची बचत करेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here