Samsung चे 5 सर्वात स्वस्त Mobile Phone, फक्त 1400 रुपयांपासून सुरु होते किंमत!

5 cheapest Samsung Mobile Phone in india

Airtel आणि Reliance Jio नं भारतात 5G Service चा शुभारंभ केला आहे. त्यामुळे वेगवान डेटा स्पीडचा अनुभव काही लोक घेतील. परंतु अजूनही देशातील मोठी लोकसंख्या अशी आहे जी टचस्क्रीन Android Smartphone नव्हे तर Keypad असलेला 2G Mobile Phone वापरणं पसंत करतात. हे मोबाइल युजर आपल्या फोनवर जास्त पैसे उधळत नाहीत, त्यामुळे त्यांचा प्रयत्न कमीत कमी खर्चात चांगला फोन खरेदी करण्याचा असतो. अशा 2जी युजर्ससाठी आज आम्ही Samsung च्या 5 स्वस्त कीपॅड मोबाइल फोनची लिस्ट घेऊन आलो आहोत जे फक्त 1,400 रुपयांपासून विकत घेता येतील. हे स्वस्त सॅमसंग मोबाइल फोन दीर्घकाळ टिकतात आणि युजरच्या गरजा पूर्ण करतात.

Basic Mobile Phone

जर तुमच्या घरात किंवा ओळखीत अशी व्यक्ती असेल जिला टच स्क्रीन मोबाइल वापरता येत नाही तसेच फोनमध्ये इंटरनेट वापरत नाही, तर अशा व्यक्तीसाठी हे कीपॅड फीचर फोन परफेक्ट ऑप्शन आहेत. हे बेसिक मोबाइल फोन घरातील वयोवृद्ध लोकांच्या कामी येतेय ज्यांना फोनवर बोलायला खूप आवडतं. तसेच जे लोक अत्यंत कमी किंमतीत मोबाइल घेऊ इच्छित आहेत किंवा स्मार्टफोनला बॅकअप म्हणून देखील फिचर फोन्सचा विचार करता येईल. हे फीचर फोन्स एखाद्या नजीकच्या मोबाइलच्या दुकानात किंवा रिटेल स्टोरवरून विकत घेता येतील.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

Samsung Basic Mobile

Samsung Guru FM Plus

नावावरून तुम्हाला समजलं असेल की हा सॅमसंग मोबाइल फोन खासकरून म्यूजिकचा आनंद घेण्यासाठी बनवण्यात आला आहे. फोनमध्ये 3.5एमएम स्टीरियो ईयरफोन वापरता येतात. तसेच एफएम रेडियो स्पिकरवर ऐकता येईल. फोनचा कलर डिस्प्ले इनरिच टेक्स्टसह येतो म्हणजे फोन स्क्रीनवरील प्रत्येक अक्षर स्पष्ट दिसतं.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

या सॅमसंग फीचर फोनमध्ये 800एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे जी मायक्रो यूएसबीच्या माध्यमातून चार्ज करता येईल. सोबत मिळणारी चार्जिंग केबल फोनमध्ये गाणी इत्यादी लोड करण्याच्या कामी येते. पेटीएम मॉलवर हा फोन फक्त 1,400 रुपयांमध्ये मिळत आहे.

Samsung Guru 1215

हा कीपॅड असलेला सॅमसंग फोन 1,499 रुपयांमध्ये बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. मोबाइलमध्ये 1.50 इंचाचा कलर डिस्प्ले देण्यात आला आहे जो टीएफटी पॅनलवर बनला आहे. हा सिंगल सिम फोन आहे ज्यात 4एमबी रॅम आहे. फोनमध्ये 800एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

थक्क करणारी बाब म्हणजे फुल चार्जमध्ये हा मोबाइल फोन 720 तासांपर्यंत वापरता येतो. तुम्हाला हिशोब करण्याची गरज नाही, आम्ही सांगतो की 720 तास म्हणजे 30 दिवस! म्हणजे सॅमसंगचा हा फोन एकदा चार्ज केल्यावर संपूर्ण एक महिना चार्जींगविना चालतो.

Samsung Guru 1200

फक्त 1,500 रुपयांमध्ये यह सॅमसंग मोबाइल फोन मार्केटमध्ये सेलसाठी उपलब्ध आहे. शानदार बिल्ड क्वॉलिटी सह या फोनमध्ये मजबूत कीपॅड देण्यात आला आहे, ज्याच्या मध्यभागी नेव्हिगेशन बटन देखील आहे. हा फोन 1.52 इंचाच्या कलर डिस्प्लेला सपोर्ट करतो जो टीएफटी पॅनलवर बनला आहे.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

या सॅमसंग मोबाइलमध्ये 4 एमबी रॅम आणि 8 एमबी मेमरी देण्यात आली आहे. हा फोन पावरफुल फ्लॅश लाइटला देखील सपोर्ट करतो. तसेच एकदा फुल चार्ज केल्यावर हा मोबाइल जवळपास 500 तास सतत ऑन राहू शकतो. हा Blue, Black, Gold आणि White कलरमध्ये विकत घेता येईल.

Guru Music 2

स्वस्त फोनमध्ये म्यूजिकची मजा घेण्यासाठी हा मोबाइल बेस्ट आहे जो फक्त 1,999 रुपयांमध्ये विकला जात आहे. या कीपॅड मोबाइल फोनमध्ये 2 इंचाची कलर स्क्रीन देण्यात आली आहे जीच्या खाली स्टाईलिश बटन पॅनल आहे. सॅमसंग गुरू म्यूजिक 2 मध्ये 3,000 गाणी सेव्ह करता येतील तसेच 16जीबी मेमरी कार्ड वापरता येईल.

5 cheapest Samsung Mobile Phone in india

हेडफोन व लीड सोबतच म्यूजिकची मजा स्पिकरवर देखील घेता येईल जे खूप पावरफुल साउंड क्वॉलिटी देतात. गाणी प्ले आणि पॉज करण्यासाठी खास बटन देण्यात आले आहेत. हा ड्युअल सिम फोन आहे ज्यात एफएम रेडियो, एमपी3 आणि एमपी4 चा आनंद घेता येईल.

Samsung Metro 313

सॅमसंग मेट्रो 313 मोबाइल फोन 2,690 रुपयांमध्ये विकत घेता येईल जो Gold आणि Black दोन रांगांमध्ये येतो. या फोनमध्ये 128 x 160 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 2 इंचाचा क्यूक्यूवीजीए टीएफटी डिस्प्ले देण्यात आला आहे जो 65के कलर डेप्थला सपोर्ट करतो. हा एक ड्युअल सिम फोन आहे ज्यात 2G GSM चा वापर करता येतो.

या फीचर फोनमध्ये 3.5एमएम जॅक आणि ब्लूटूथ देखील देण्यात आलं आहे जो एफएम रेडियो, एमपी3 आणि 3जीपी व्हिडीओला देखील सपोर्ट करतो. या फोनमध्ये 1,000एमएएचची मोठी बॅटरी आहे तसेच 16 जीबी पर्यंतचा मेमरी कार्डचा वापर करता येतो.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठीला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here