2,099 मध्ये स्वस्त 4G फिचर फोन itel Magic X लाँच; Jio Phone होणार बाजारातून हद्दपार?

बजेट स्मार्टफोन बनवणारी मोबाइल कंपनी itel नं आज भारतीय बाजारात दोन नवीन 4G Feature Phones सादर केले आहेत. ये दोन्ही KeyPad Mobile Phone itel Magic X आणि itel Magic X Play नावानं भारतात लाँच झाले आहेत. या दोन्ही आयटेल मोबाइल फोन्सची सर्वात मोठी खूबी म्हणजे हे dual 4G VoLTE सह येतात. त्यामुळे हे फोन भारतातील JioPhone ला थेट टक्कर देते आहेत.

itel Magic X आणि Magic X Play ची किंमत

नव्या 4G Feature Phones ची प्राइस पाहता itel Magic X Play भारतात 2,099 रुपयांमध्ये लाँच केला गेला आहे तसेच itel Magic X फीचर फोन 2,299 प्राइसवर लाँच झाला आहे. आयटेल मॅजिक एक्स प्ले Midnight Black आणि Mint Green कलरमध्ये सेलसाठी उपलब्ध होईल. तर आयटेल मॅजिक एक्स Midnight Black आणि Pearl White कलरमध्ये विकत घेता येईल. हे दोन्ही कीपॅड असलेले 4जी मोबाइल फोन ऑनलाईन व ऑफलाईन रिटेल स्टोर्सवर विक्रीसाठी उपलब्ध होतील.

Jio Phone ला टक्कर

मुकेश अंबानीद्वारे लाँच करण्यात आलेल्या Jio Phone हा 4G Feature Phone बाजारात खूप चर्चेत होता. या फिचर फोनची विक्रमी विक्री झाली होती परंतु सध्या जियोफोनचा खूप कमी स्टॉक बाजारात येत आहे. या फोनमध्ये फक्त रिलायन्स जियो सिमचा वापर करता येतो. त्यामुळे हे नवीन 4जी फीचर फोन आल्यामुळे जियोफोन बाजारातून हद्दपार देखील होऊ शकतो, हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही.

itel Magic X आणि Magic X Play चे स्पेसिफिकेशन्स

iTel Magic X मध्ये कंपनीनं 2.4 इंचाची 3डी कर्व्ड स्क्रीन दिली आहे जो एक क्यूवीजीए डिस्प्ले आहे. तर दुसरीकडे iTel Magic X Play 1.77 इंचाच्या डिस्प्लेला सपोर्ट करतो. दोन्ही फोन्समध्ये स्क्रीनच्या वरच्या बाजूला स्पिकर आहे तर खाली टी9 कीपॅड देण्यात आला आहे. या 4जी फीचर फोन्समध्ये राउंड शेप नेव्हिगेशन बटन मिळतं तसेच म्यूजिक शॉर्टकट बटन आहे. LetsChat हे आयटेल मोबाइल्सचं खास फीचर आहे जे फ्री व्हॉइस आणि मेसेज सर्व्हिस देतं.

आयटेल 4जी फीचर फोन 48 एमबी रॅमला सपोर्ट करतो सोबत 128 एमबी की इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. दोन्ही मोबाइल फोन्समध्ये 64 जीबी मायक्रोएसडी कार्डचा वापर करता येतो. कंपनीनुसार हे कीपॅड फोन 2000 कॉन्टेक्ट, 500 एसएमएस आणि 250 एमएमएस साठवून ठेऊ शकतात. या फीचर फोनमध्ये डिस्प्ले आणि कीपॅड दरम्यान एलईडी लाइट आहे जी नोटिफिकेशन्स आल्यावर चमकते.

itel Magic X आणि Magic X Play ड्युअल सिम फोन आहेत तसेच दोन्ही सिम स्लॉटमध्ये 4G SIM चा वापर केला जाऊ शकतो. तर प्रोसेसिंगसाठी हे 4जी फीचर फोन टी107 चिपसेटवर काम करतात. पावर बॅकअपसाठी मॅजिक एक्स मध्ये 1,200एमएएच तर मॅजिक एक्स प्ले मध्ये 1,900एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. या मोबाइल फोन्समध्ये वीजीए कॅमेरा, 3.5एमएम जॅक, वायरलेस एफएम व ब्लूटूथ 4.2 चे ऑप्शन्स आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here