2999 रुपयांमध्ये आला स्वस्त 4जी फोन; Dual 4G VoLTE सह Hotspot फीचरही

स्वस्त फीचर स्मार्टफोन बनवण्यासाठी लोकप्रिय असलेल्या टेक कंपनी Itel ने भारतीय बाजारात आणखी एक कमी किंमत असलेला 4G feature phone सादर केला आहे. नवीन Itel Magic X Pro 4G फोन भारतात लाँच झाला आहे. हा एक Keypad Mobile आहे जो 4जी कनेक्टिव्हिटीसह आला आहे. आयटेल मॅजिक एक्स प्रो 4जी फोनमध्ये dual 4G VoLTE आणि Wi-Fi सोबतच hotspot connectivity फीचर देखील देण्यात आलं आहे जो ज्यामुळे हा शानदार 4जी फीचर फोन बनतो. Itel Magic X Pro 4G Phone Price 2,999 रुपये आहे जो JioPhone ला थेट टक्कर देतो.

Itel Magic X Pro 4G चे फीचर्स

आयटेल मॅजिक एक्स प्रो 4जी फोन 240 × 320 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 2.4 इंचाच्या क्यूवीजीए डिस्प्लेला सपोर्ट करतो जो 167पीपीआयला सपोर्ट करतो. याचे डायमेंशन 129*54*15.5एमएम आहे. स्क्रीनच्या खाली टी9 कीपॅड देण्यात आला आहे. या कीपॅड मध्ये वाय-फायचा शार्टकट बटन देखील देण्यात आला आहे. तसेच टॉर्च लाइट, व्हॉइस इनपुट (text-to-speech) आणि वाइब्रेशन शार्टकट बटनच्या माध्यमातून अ‍ॅक्टिव्हेट करता येईल. हे देखील वाचा: 11 हजारांच्या बजेटमध्ये Redmi चा 5G Phone! बंपर डिस्काउंटसह Redmi 11 Prime 5G उपलब्ध

4जी फीचर फोन होना Itel Magic X Pro ची सर्वात मोठी खासियत आहे. हा फोन ड्युअल 4जी वोएलटीईला सपोर्ट करतो ज्यात एचडी व्हॉइस ओव्हर एलटीई कॉल करता येतात. या कीपॅड मोबाइलमध्ये वायफायचा सपोर्ट देण्यात आला आहे तसेच हाटॅस्पॉट फीचर देखील आहे. Hotspot Tethering च्या माध्यमातून या फोनमधील अ‍ॅक्टिव्ह 4जी डेटा दुसऱ्या स्मार्टफोनला कनेक्ट करता येतो आणि यात इंटरनेट वापरता येईल. एकाच वेळी 8 फोन कनेक्ट करता येतील.

Itel Magic X Pro 4G च्या बॅक पॅनलवर वीजीए कॅमेरा देण्यात आला आहे जोडीला फ्लॅश लाईट देखील देण्यात आली आहे. या 4जी फीचर फोनमध्ये 12 भारतीय भाषांचा वापर करता येतो. पावर बॅकअपसाठी या कीपॅड फोनमध्ये 2,500एमएएच ची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच या मोबाइल फोनमध्ये व्हॉइस असिस्टंट आणि लेट्स चॅट सारखे फीचर्स देखील मिळतात. या फीचर फोनमध्ये ड्युअल सिम कार्ड्सचा वापर करता येतो. हे देखील वाचा: बाहुबली स्मार्टफोन लाँच! दणकट प्रोसेसर, शानदार कॅमेऱ्यासह Xiaomi 13 आणि Xiaomi 13 Pro ची एंट्री

Itel Magic X Pro 4G ची किंमत

आयटेल मॅजिक एक्स प्रो 4जी फोन फक्त 2,999 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. या फोन सोबत कंपनी 2 वर्षांची वॉरंटी देत आहे. आयटेलचा 4जी फोन black आणि blue कलरमध्ये विकत घेता येईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here