फक्त 8 मिनिटांत बॅटरी फुल! 240W चार्जिंगसह Realme GT3 240W आला भारतात

Highlights

Realme GT3 240W 28 फेब्रुवारीला MWC 2023 च्या मंचावरून लाँच होईल.

या स्मार्टफोनमध्ये 240W Fast Charging टेक्नॉलॉजी दिली जाईल.

ही चार्जिंग टेक्नॉलॉजी फक्त 8 मिनिटांत बॅटरी फुल करते.

रियलमीनं मोबाइलचा महामेळावा म्हणजे मोबाइल वर्ल्ड काँग्रेसच्या मंचावरून आपला तगडा स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीनं आपल्या टेक्नॉलॉजीचे प्रदर्शन करत 240W Fast Charging टेक्नॉलॉजी असलेला स्मार्टफोन Realme GT3 240W जागतिक बाजारात सादर केला आहे. यात Qualcomm Snapdragon 8+ Gen 1, 50MP Triple Rear Camera आणि Stainless Steel Vapor Cooling Max 2.0 देखील आहे.

240W Fast Charging

240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी रियलमी जीटी3 स्मार्टफोनची सर्वात मोठी खासियत असेल. ही टेक्नॉलॉजी चीनमध्ये लाँच झालेल्या Realme GT3 240W मध्ये देखील आहे. त्यामुळे अंदाज लावला जात आहे की Realme GT3 240W याच फोनचा ग्लोबल व्हर्जन असेल. 240वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीच्या जीवावर जीटी3 240वॉट मधील 4,600एमएएचची बॅटरी फक्त 8 मिनिटांत फुल चार्ज होते. हे देखील वाचा: Yulu Bajaj नं लाँच केल्या दोन इलेक्ट्रिक स्कूटर Miracle GR आणि DeX GR, पाहा किंमत

Realme GT3 240W Specifications

  • 6.74″ 144Hz display
  • 16GB RAM + 1TB storage
  • Qualcomm Snapdragon 8+ Gen 1
  • 50MP Triple Rear Camera

रियलमी जीटी3 240वॉट स्मार्टफोन 2772 x 1240 पिक्सल रिजोल्यूशन असलेल्या 6.74 इंचाच्या मोठ्या 1.5के डिस्प्लेला सपोर्ट करतो. पंच-होल स्टाईल ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनली आहे तसेच 144हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 1500हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करते. या स्क्रीनवर 100% DCI-P3, 1.07बिलियन कलर्स आणि 5,000,000:1 कॉन्ट्रास्ट रेशियो सारखे फीचर्स मिळतात.

Realme GT3 240W क्वॉलकॉमच्या 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनलेल्या स्नॅपड्रॅगन 8प्लस जेन 1 ऑक्टाकोर प्रोसेसरसह लाँच झाला आहे जो 3.0गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीडवर चालतो. ग्राफिक्ससाठी या मोबाइल फोनमध्ये एड्रेनो जीपीयू 730 जीपीयू देण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉइड 13 आधारित रियलमी युआय 4.0 वर चालतो, तसेच यात LPDDR5X RAM आणि UFS 3.1 ROM टेक्नॉलॉजी आहे. हे देखील वाचा: नवीन फोन येताच जुना स्टॉक संपवण्याची Xiaomi ला घाई; 10 हजारांनी कमी केली दणकट फोनची किंमत

फोटोग्राफीसाठी रियलमी जीटी3 240वॉट ट्रिपल रियर कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. फोनच्या बॅक पॅनलवर एलईडी फ्लॅशसह एफ/1.88 अपर्चर असलेला 50MP Sony IMX 890 OIS प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. जोडीला एफ/2.2 अपर्चर असलेली 8 मेगापिक्सलची वाइड अँगल लेन्स आणि एफ/3.3 अपर्चर असलेला 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हा स्मार्टफोन एफ/2.45 अपर्चर असलेल्या 16 मेगापिक्सल फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here