240km range सह लाँच झाली नवी Electric Scooter; प्राइस 70 हजारांपेक्षा कमी!

दिवसेंदिवस Electric Scooter ची मागणी वाढत आहे, ती पूर्ण करण्यासाठी विविध कंपन्या आपल्या Battery Scooty बाजारात सादर करत आहेत. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे विजेवर चार्ज होणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी वाहन म्हणजे Electric Two-Wheeler मध्ये लोक रुची दाखवत आहेत आणि खरेदी देखील करत आहेत. भारतीय इलेक्ट्रिक व्हेईकल मार्केटमध्ये आता iVOOMi Energy नं आपला अजून एक नवीन प्रोडक्ट जोडला आहे. कंपनीनं नवीन इलेक्ट्रिक स्कूटर iVOOMi S1 लाँच केली जिची प्राइस फक्त 69,999 रुपये आहे तसेच ही सिंगल चार्जमध्ये 240 किलोमीटरची रेंज देते.

iVOOMi S1 Electric Scooter Price

आयवूमी एनर्जीनं आपली नवीन इलेक्ट्रिक स्कूटर तीन व्हेरिएंट्समध्ये लाँच केली आहे. आयवूमी एस1 च्या या तीन मॉडेल्सची नावे iVOOMi S1 80, iVOOMi S1 200 आणि iVOOMi S1 240 अशी आहेत. यांची किंमत पाहता आयवूमी एस1 80 ची प्राइस फक्त 69,999 आहे. तर आयवूमी एस1 200 तुम्ही 85,000 रुपयांमध्ये विकत घेऊ शकता तसेच या इलेक्ट्रिक स्कूटरचा टॉप मॉडेल आयवूमी एस1 240 1,21,000 रुपयांमध्ये लाँच झाला आहे. ही Peacock Blue, Night Maroon आणि Dusky Black कलरमध्ये विकत घेता येईल. हे देखील वाचा: जबरदस्त कॅमेरा, शक्तिशाली प्रोसेसरसह Vivo X90 5G सीरीज लाँच; वनप्लस-सॅमसंगचा टेंशन वाढलं

240 km per charge range iVOOMi S1 Electric Scooter price in india

iVOOMi S1 Electric Scooter ची रेंज

iVOOMi S1 80, iVOOMi S1 200 आणि iVOOMi S1 240 च्या नावावरून समजलं असेल की या स्कूटरचा बेस मॉडेल 80 किलोमीटरच्या रेंजसह येतो. म्हणजे एकदा फुल चार्ज केल्यानंतर ही इलेक्ट्रिक स्कूटर सतत 80 किलोमीटरचा प्रवास करू शकते. अशाप्रकारे एस1 200 मॉडेलमध्ये सिंगल चार्जमध्ये दोनशे किलोमीटरची रेंज मिळते. तसेच कंपनीचा सर्वात लेटेस्ट आयवूमी एस1 240 मॉडेल एकदा फुल चार्ज केल्यावर 240 किलोमीटर पर्यंत नॉनस्टॉप धावू शकतो. हे देखील वाचा: कॅमेऱ्याच्या जोरावर राज्य करण्यासाठी आला Vivo X90 Pro+, यापुढे DSLR पण होतील फेल!

240 km per charge range iVOOMi S1 Electric Scooter price in india

iVOOMi S1 Electric Scooter चे फीचर्स

या टू-व्हीलरचे फीचर्स पाहता iVOOMi S1 240 मध्ये 4.2kWh च्या दोन बॅटरीज देण्यात आल्या आहेत तसेच हा स्कूटर 2.5kW बॅटरी पॅकसह येतो. iVOOMi S1 80 स्कूटर मॉडेलमध्ये 1.5kWh battery pack देण्यात आला आहे तसेच ही इलेक्ट्रिक स्कूटर 2.5kW hub-mounted motor सह बाजारात आली आहे. ही आयवूमी एनर्जी स्कूटर 55kmph चा टॉप स्पीड देते तसेच यात Eco, Rider आणि Sport तीन राइडिंग मोड देण्यात आले आहेत.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here