210GB डेटा आणि 105 दिवसांची वैधता असलेला BSNL चा स्वस्त प्लॅन; Airtel-Jio कडे नाही असा प्लॅन

BSNL Prepaid Plans: नवरात्रीच्या सणाला सुरुवात झाली आहे आणि या फेस्टिव सीजनच्या निमित्ताने BSNL आपल्या रिचार्ज प्लॅनसह बेस्ट ऑफर (Navratri Festival Offers) देत आहे. सरकारी टेलीकॉम कंपनी बीएसएनएल आपल्या युजर्स (BSNL Recharge Offers) साठी कमी किंमत असलेला अर्फोडेबल प्लॅन BSNL 666 Plan सह शानदार बेनिफिट्ससह सादर करत आहे. चला जाणून घेऊया या बीएसएनएलच्या 666 प्लॅनसह मिळणारे बेनिफिट्स आणि वॅलिडिटीबाबत सर्वकाही.

BSNL 666 Prepaid Plan

बीएसएनएलचा 666 रुपयांचा प्लॅन ग्राहकांसाठी 105 दिवसांच्या वॅलिडिटीसह सादर करण्यात आला आहे. या प्लॅनची माहिती बीएसएनएल राजस्थानच्या ट्विटर हँडलवरून शेयर करण्यात आली आहे. या प्लॅनमध्ये मिळणारे सर्व फायदे राजस्थान सर्कलमध्ये लागू होतील. तसेच दुसऱ्या राज्यांमध्ये या प्लॅनमध्ये मिळणारे बेनिफिट्स वेगळे असू शकतात. हे देखील वाचा: उद्या लाँच होतेय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार Tata Tiago EV; जाणून घ्या खासियत

210GB Data And 110 Days Validity Bsnl Rs 666 Plan Details Compete Airtel Reliance Jio Recharge

210GB मिळेल डेटा

यात रोज 2 जीबी डेटा दिला जात आहे. अशाप्रकारे 105 दिवसांमध्ये ग्राहक एकूण डेटा 210GB डेटा वापरू शकतील. विशेष म्हणजे डेली डेटा संपल्यावर देखील युजर्सना इंटरनेट वापरता येईल. फक्त लिमिट संपल्यावर डेटा स्पीड कमी होऊन 40Kbps होईल. त्याचबरोबर प्लॅनमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 एसएमएस दिले जातील.

फ्री मिळेल Hardy Games चे सब्सक्रिप्शन

या रिचार्जमध्ये फ्री कॉलिंग, डेटा आणि एसएमएस व्यतिरिक्त फ्री कॉलरट्यून्स आणि लोकधुन कंटेंटची मेंबरशिप दिली जात आहे. खास बाब अशी की बीएसएनएल ONE97 कम्युनिकेशंस लिमिटेडद्वारे हार्डी गेम्स मोबाइल सर्व्हिस (Hardy Games Mobile Service) देखील या प्लॅनमध्ये बंडल करत आहे. ऑफर पाहून असं म्हणता येईल की बीएसएनएलद्वारे सादर केला जाणारा हा एक शानदार प्लॅन आहे. हे देखील वाचा: How To Book Confirm Train Ticket Online: अशाप्रकारे मिळवा प्रत्येकवेळी ट्रेनमध्ये मिळवा कंफर्म तिकीट

नोट: सरकारी कंपनी बीएसएनएलचा हा प्लॅन राजस्थान सर्कलसाठी सादर करण्यात आला आहे. परंतु, लिस्टमध्ये इतर राज्यांचा देखील समावेश होऊ शकतो. त्यामुळे या प्लॅननं तुमच्या मोबाइल नंबरला रिचार्ज करण्याचा विचार करत असाल तर या प्लॅनची संपूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला बीएसएनएलच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन माहिती घेऊ शकता किंवा कस्टमर केयरला कॉल करू शकता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here