जबरदस्त iQOO Neo7 ची लाँच डेट समजली; MediaTek Dimensity 9000+ चिपसेटसह मिळेल 120W चार्जिंग

20 october iQOO Neo 7 launch date MediaTek Dimensity 9000 plus chipset

vivo सब-ब्रँड आयकूनं भारतीय बाजारात अनेक हिट स्मार्टफोन सादर केले आहेत. iQOO Z6 Lite 5G या ब्रँडचा लेटेस्ट मोबाइल फोन आहे जो भारतीय बाजारात 13,999 रुपयांच्या बेस किंमतीत उपलब्ध झाला आहे. भारतात आयकू झेड6 लाइट 5जी फोन लाँच केल्यानंतर आता कंपनी इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपला नवीन स्मार्टफोन iQOO Neo7 सादर करणार आहे. आयकू नियो7 20 ऑक्टोबरला लाँच होईल जो MediaTek Dimensity 9000+ वर चालेल.

iQOO Neo7 Launch

कंपनीनं घोषणा केली आहे की आयकू नियो7 येत्या 20 ऑक्टोबरला लाँच होईल. यादिवशी हा स्मार्टफोन चीनी मार्केटमध्ये एंट्री घेतल्यांनंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये सादर केला जाईल. हा एक 5जी मोबाइल फोन असेल जो फ्लॅगशिप रेंजमध्ये सादर केला जाऊ शकतो. iQOO Neo7 च्या भारतीय लाँचची कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही, परंतु आशा आहे 20 ऑक्टोबरला टेक मार्केटमध्ये डेब्यू केल्यानंतर हा स्मार्टफोन लवकरच भारतीय बाजाराकडे वळेल. हे देखील वाचा: 8,200mAh च्या राक्षसी बॅटरीसह Lenovo Tab P11 Pro (2nd gen) भारतात लाँच, फीचर्स आहेत पावरफुल

20 october iQOO Neo 7 launch date MediaTek Dimensity 9000 plus chipset

iQOO Neo7 Specifications

आयकू नियो7 बद्दल कंपनीनं स्वतः घोषणा केली आहे की हा स्मार्टफोन मीडियाटेक डिमेनसिटी 9000+ चिपसेटवर लाँच होईल. हा चिपसेट 4नॅनोमीटर फॅब्रिकेशनवर बनला आहे आणि 5जी नेटवर्कला सपोर्ट करतो. त्याचबरोबर iQOO Neo7 मध्ये गेमिंगसाठी देखील खास टेक्नॉलॉजीचा वापर केला जाईल. हा आयफोन फोन 8 जीबी रॅम तसेच 256 जीबी इंटरनल स्टोरेजवर लाँच होईल.

20 october iQOO Neo 7 launch date MediaTek Dimensity 9000 plus chipset

iQOO Neo7 स्मार्टफोनमध्ये ओएलईडी पॅनलवर बनलेल्या फुलएचडी+ डिस्प्लेला सपोर्ट करेल जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेटवर चालेल. ही स्क्रीन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येईल. फोटोग्राफीसाठी आयकू नियो7 मध्ये 50 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा सेन्सर तसेच चार्जिंगसाठी 120वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळू शकते. आयकू नियो7 प्राइस व स्पेसिफिकेशन्ससाठी 20 ऑक्टोबरची वाट बघावी लागेल. हे देखील वाचा: Jio की BSNL? कोणत्या कंपनीचा 90 दिवसांचा प्लॅन आहे बेस्ट? जाणून घ्या

iQOO Z6 Lite 5G specification

iQOO Z6 Lite मध्ये 6.58-Fv FHD+ डिस्प्ले 2408×1080 पिक्सल रिजॉल्यूशन, 120Hz रिफ्रेश रेट आणि 240Hz टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. फोनमध्ये जगातील पहिला स्नॅपड्रॅगन 4 जेन 1 प्रोसेसर मिळतो. डिवाइसमध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128GB पर्यंत स्टोरेज मिळते. पावर बॅकअपसाठी 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh ची बॅटरी मिळते. iQOO Z6 Lite च्या मागे 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा असलेला ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. तर सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here