16 नोव्हेंबरला लाँच होईल स्वस्त आणि मस्त 5जी फोन; असे असतील OPPO A1 Pro चे स्पेसिफिकेशन्स

ओप्पोसंबंधित एक मोठी बातमी काही दिवसांपूर्वी समोर आली होती की कंपनी आपल्या ‘ए’ सीरीजच्या नवीन स्मार्टफोनवर काम करत आहे जो OPPO A1 Pro 5G नावानं लाँच होईल. आता ओप्पो मोबाइल्सनं ओप्पो ए1 प्रो 5जीच्या लाँच डेटची घोषणा केली आहे. कंपनीच्या घोषणेनुसार, OPPO A1 Pro 5G फोन 16 नोव्हेंबरला लाँच होईल. या दिवशी ओप्पो 5जी फोन सर्वप्रथम कंपनीच्या होम मार्केट अर्थात चीनी बाजारात लाँच होईल, त्यानंतर जगभरातील बाजारपेठांमध्ये या हँडसेटची एंट्री होईल. ओप्पो ए1 प्रो 5जी च्या लाँचपूर्वीच या फोनचे अनेक स्पेसिफिकेशन्स देखील समोर आले आहेत.

OPPO A1 Pro 5G

ओप्पो ए1 प्रो 5जी लाँच डेट सोबतच कंपनीनं फोनचा टीजर व पोस्टर देखील शेयर करण्यास सुरुवात केली आहे. समोर आलेल्या फोटोजवरून समजलं आहे की OPPO A1 Pro 5G फोनमध्ये कर्व्ड एज डिस्प्ले दिली जाईल. तसेच फोनच्या बॅक पॅनलवर ओव्हल कॅमेरा मॉड्यूल दिसत आहे, ज्यात प्रायमरी कॅमेरा सेन्सर 108 मेगापिक्सलचा असेल. हा ओप्पो फोन भारतीय वेळेनुसार 16 नोव्हेंबरला दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी लाँच होईल. हे देखील वाचा: Vivo ला टक्कर देण्यासाठी येतायत OPPO Reno 9, Reno 9 Pro आणि Reno 9 Pro Plus; लाँचपूर्वीच माहिती लीक

OPPO A1 Pro 5G Specifications

समोर आलेल्या लीक्सनुसार, ओप्पो ए1 प्रो 5जी फोनमध्ये 6.7 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले दिली जाईल. ही स्क्रीन अ‍ॅमोलेड पॅनलवर बनलेली असेल ज्यात 10बिट कलरसह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर टेक्नॉलॉजी देखील मिळेल. टेक विश्वात चर्चा आहे की ही फोन स्क्रीन कंपनीच्या आगामी OPPO Reno 9 series मध्ये देखील दिली जाईल.

OPPO A1 Pro 5G मोबाइल क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 695 चिपसेटसह लाँच केला जाऊ शकतो जो ऑक्टा-कोर प्रोसेसर प्रोसेसरवर चालेल. हा फोन तीन व्हेरिएंट्समध्ये मार्केटमध्ये लाँच होऊ शकतो ज्यात 6GB RAM, 8GB RAM आणि 12GB RAM सह 128GB, 256GB तथा 512GB storage ऑप्शन मिळू शकतात. हे देखील वाचा: आतापर्यंतचा सर्वात शक्तिशाली वनप्लस; आगामी OnePlus 11 चे स्पेसिफिकेशन्स लीक, पाहा डिटेल्स

ओप्पो ए1 प्रो 5जी मध्ये 108 मेगापिक्सल प्रायमरी रियर कॅमेरा असण्याची शक्यता आहे, जोडीला 2 मेगापिक्सलचा सेकंडरी सेन्सर देखील दिला जाऊ शकतो. तसेच पावर बॅकअपसाठी 67वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी असलेली 5,000एमएएच बॅटरी असल्याची माहिती देखील लीकमधून समोर आली आहे.

लेटेस्ट मोबाइल आणि टेक न्यूज, गॅजेट्स रिव्यूज आणि रिचार्ज प्लॅनसाठी 91mobiles मराठी ला Facebook वर फॉलो करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here