150KM च्या जबरदस्त रेंजसह येतेय Electric Bike; पुढील आठवड्यात होणार लाँच

इंडियन ऑटोमोटिव्ह मार्केटमध्ये अनेक इलेक्ट्रिक टू-व्हीलरसह इलेक्ट्रिक कार्स (Electric Car) लाँच केल्या जात आहेत. विशेष म्हणजे भारतीय बाजारात इलेक्ट्रिक कार्सच्या तुलनेत इलेक्ट्रिक दुचाकी वाहने जास्त लाँच होत आहेत. आता यात जयपुरमधील ईव्ही कंपनी Hop Electric देखील आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार करत नवीन इलेक्ट्रिक बाइक Hop OXO (Electric Bike Launch) लाँच करणार आहे. कंपनीनं या ईव्हीच्या लाँचिंग डेट (Hop Oxo Electric Bike Launch) सोबतच टीजर देखील जारी केला आहे.

HOP OXO Electric Bike Launch Date

कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार, 5 सप्टेंबरला हॉप ऑक्सो इलेक्ट्रिक बाइक लाँच केली जाईल. तसेच या दिवशी बाइकची किंमत, सेल डेट आणि सर्व फीचर्सचा खुलासा केला जाईल. चला जाणून घेऊया या बाइकची रेंज आणि अन्य फीचर्सची माहिती. हे देखील वाचा: जुन्या आठवणी होणार ताज्या! रस्त्यावर पुन्हा धावणार LML Scooter; 29 सप्टेंबरला 3 Electric Two-Wheeler घेणार एंट्री

HOP OXO Electric Bike Booking

हॉप ऑक्सो Electric Bike (Hop OXO Electric Motorcycle) ची प्री-बुकिंग कंपनीच्या वेबसाईटवर सुरु आहे. तूमधी फक्त 999 रुपयांमध्ये ही ई-बाइक बुक करू शकता. बुकिंग सुरु होताच काही तासांमध्ये 5000 यूनिट बुक झाल्याची माहिती कंपनीनं दिली आहे. या बाइकची किंमत 1,20,000 रुपये (एक्स-शोरूम) असण्याची शक्यता आहे. त्यामुळे भारतात असलेल्या Revolt RV 400, Tork Kratos आणि Oben Rorr सारख्या ई-बाइक्सना HOP OXO टक्कर देईल. चला जाणून घेऊया या हाय-स्पीड इलेक्ट्रिक मोटरसायकलच्या संभाव्य फीचर्सची माहिती.

कंपनी बराच काळापासून आपल्या फ्लॅगशिप मोटरसायकल Hop OXO चा टीजर जारी करत आहे, ज्यात या ई-बाइकच्या लुकची माहिती समोर आली आहे. टीजरनुसार, या बॅटरी असलेल्या बाइकमध्ये एलईडी हेडलॅम्प, डीआरएल, स्पीयर शेप टर्न इंडिकेटर्स आणि ट्रेंडी वायजर मिळेल. तसेच ही E-Bike सिंगल सीट सेटअपसह येऊ शकते आणि इस इलेक्ट्रिक बाइकमध्ये मोठा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो.

OXO मध्ये फ्रंटला टेलिस्कोपिक सस्पेन्शन मिळेल तर मागे ड्युअल शॉकर्स देण्यात येतील. डिस्क ब्रेक्स मात्र दोन्हीकडे मिळतील. या ई-बाइकमध्ये दिल्या जाणाऱ्या बॅटरीच्या मदतीनं ही सिंगल चार्जवर 100 किलोमीटर ते 150 किलोमीटर दरम्यानची रेंज देऊ शकते. तसेच हॉप ऑक्सोचा टॉप स्पीड ताशी 80-90 किलोमीटर पर्यंत असू शकतो. या बाइकमध्ये ड्युअल बॅटरी मिळू शकते. हे देखील वाचा: फुल चार्जमध्ये 586km ची रेंज! इतकी आहे Mercedes च्या शक्तिशाली इलेक्ट्रिक कारची किंमत

Hop बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्समध्ये देखील गुंतवणूक करत आहे, ज्यामुळे फक्त 20 सेकंदांत बॅटरीज बदलता येतील. सध्या कंपनीच्या ईव्ही पोर्टफोलियोमध्ये दोन इलेक्ट्रिक स्कूटर्सचा समावेश आहे, ज्या चांगल्या स्पेक्ससह सादर करण्यात आल्या आहेत. या इलेक्ट्रिक स्कूटर्सची नावे Lyf आणि Leo अशी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here