15 हजारांत 11GB रॅम, 50MP कॅमेरा आणि 5G ची ताकद; Realme 9i ची स्पेक्स आणि किंमत लीक

Realme 9i 5G स्मार्टफोन भारतात 18 ऑगस्टला लाँच होऊ शकतो. रियलमीच्या आगामी स्मार्टफोनचं लँडिंग पेज काही दिवसांपूर्वीच रियलमी इंडियाच्या वेबसाइटवर लाइव्ह झालं आहे. रियलमी फोनचं लँडिंग पेज लाइव्ह झाल्यामुळे या फोनच्या रियर पॅनलच्या डिजाइन आणि प्रोसेसरची माहिती मिळाली आहे. रियलमीचा हा फोन मीडियाटेकच्या डिमेन्सिटी 810 प्रोसेसरसह लाँच केला जाईल. फोन लाँच होण्याच्या आधीच याच्या स्पेसिफिकेशन्स, प्राइस आणि रेंडर्सबद्दल माहिती समोर आली आहे. पुढे आम्ही तुम्हाला Realme 9i 5G स्मार्टफोनबद्दल सविस्तर माहिती देत आहोत.

Realme 9i 5G ची डिजाइन

Realme 9i 5G स्मार्टफोनची डिजाइन पाहता या फोनच्या फ्रंट डिस्प्लेमध्ये टियरड्रॉप नॉच मिळेल. रियलमीच्या या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा दिला जाईल. फोनच्या पावर बटन मध्ये फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. जो उजव्याबाजूला असेल. लीक इमेजनुसार रियलमीचा हा फोन ब्लॅक आणि गोल्ड कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध होईल. हे देखील वाचा: Realme घेऊन येत आहे 10,000 आणि 15,000 रुपयांमध्ये 5G फोन, Realme 10 देखील होणार लाँच

Realme 9i 5G चे स्पेसिफिकेशन्स

Realme 9i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा IPS LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचे रिजोल्यूशन Full HD+, रिफ्रेश रेट 90Hz, टच सॅम्पलिंग रेट 180Hz आहे. रियलमीचा हा स्मार्टफोन Android 12 OS आधारित Realme UI 3.0 कस्टम युजर इंटरफेसवर चालेल. फोनमध्ये मीडियाटेकच्या Dimensity 810 प्रोसेसरची ताकद मिळेल. सोबतीला फोनमध्ये 11GB रॅम सपोर्ट दिला जाऊ शकतो. ज्यात 6GB पर्यंतच्या रॅम आणि 5GB पर्यंतचा व्हर्च्युअल रॅमचा समावेश असेल. कंपनी यात 128GB बिल्ट इन स्टोरेज देईल. या फोनची स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून वाढवता येईल.

Realme 9i 5G स्मार्टफोन 8 मेगापिक्सलच्या सेल्फी कॅमेऱ्यासह सादर केला जाऊ शकतो. तर फोनच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. ज्यात एलईडी फ्लॅशसह 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाईल. तर जोडीला 2MP ची पोर्टेट लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळेल. हे देखील वाचा: Realme ची कमाल! लाँच केला सर्वात स्वस्त 5G टॅबलेट आणि कॉलिंग असलेला स्मार्टवॉच, जाणून घ्या किंमत

Realme 9i 5G ची किंमत

Realme 9i 5G स्मार्टफोन 4GB RAM + 64GB स्टोरेज आणि 6GB RAM + 128GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटसह सादर केला जाऊ शकतो. कंपनीनं या फोनच्या भारतीय किंमतीची कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु रियलमीचा हा फोन भारतात 15000 रुपयांपर्यंतच्या किंमतीत सादर केला जाईल, अशी माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here