23 टक्के डिस्काउंटसह Redmi K50i 5G उपलब्ध; जाणून घ्या ऑफर

Redmi K50i स्मार्टफोन शाओमीनं सादर केलेला मिडरेंज प्रीमियम स्मार्टफोन आहे. जो या सेगमेंटमध्ये वनप्लस नॉर्ड, ओप्पो, विवो, सॅमसंग आणि मोटोरोलाला चांगली टक्कर देत आहे. आता ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर Redmi K50i स्मार्टफोनवर दमदार डील मिळत आहे. हा फोन Mediatek च्या 5G इनेबल Dimensity 8100 प्रोसेसर, 64MP ट्रिपल रियर कॅमेरा, 144Hz रिफ्रेश रेट आणि 5000mAh च्या बॅटरीसह बाजारात आला आहे. पुढे आम्ही तुम्हाला Redmi K50i 5G स्मार्टफोनवर मिळणाऱ्या ऑफर्सची माहिती दिली आहे. तसेच फोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स देखील सांगितले आहेत.

Redmi K50i 5G वर मिळतेय जबरदस्त डील

Redmi K50i स्मार्टफोन अ‍ॅमेझॉनवर 31,999 रुपयांमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. या फोनवर सध्या 25 टक्के म्हणजे सुमारे 8000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. म्हणजे हा फोन 23,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल. तसेच ICICI बँकेच्या क्रेडिट कार्डवर EMI ट्रँजॅक्शनवर 2000 रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे. Redmi K50i चा 8GB रॅम व्हेरिएंट अ‍ॅमेझॉनवर 11,000 रुपयांच्या डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे. तसेच आणखी सूट मिळवण्यासाठी तुम्ही तुमचा जुना स्मार्टफोन एक्सचेंज करू शकता. हे देखील वाचा: बजेटला धक्का न लावता खरेदी करता येईल Samsung 5G Phone; Galaxy A14 आला कंपनीच्या वेबसाइटवर

Redmi K50i

Redmi K50i 5G चे स्पेसिफिकेशन्स

Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये 6.6-इंचाचा Full-HD+ LCD पॅनल देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 144Hz आणि टच सॅम्पलिंग रेट 270Hz आहे. हा डिस्प्ले Dolby Vision, 650 निट्स ब्राईटनेस आणि HDR10+ ला सपोर्ट करतो. कंपनीनं डिस्प्लेला Corning Gorilla Glass 5 ची सुरक्षा दिली आहे. कनेक्टिव्हिटी फोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, साईड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर, IR ब्लास्टर, ड्युअल स्टीरियो स्पिकर, Dolby Atoms, आणि लिक्विड कूलिंग 2.0 टेक्नॉलॉजी देण्यात आला आहे.

हा फोन Android 12 आधारित MIUI वर चालतो. फोनमध्ये MediaTek Dimensity 8100 चिपसेटची प्रोसेसिंग पावर मिळते. सोबतीला 8GB LPDDR5 RAM आणि 256GB UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमध्ये स्टोरेजसाठी मायक्रोएसडी कार्ड स्लॉट देण्यात आला आहे. हे देखील वाचा: प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! तुमची ट्रेन कुठे आहे हे पाहा मोबाइलवर, जाणून घ्या सोपी पद्धत

फोटोग्राफीसाठी Redmi K50i 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 64MP चा प्रायमरी कॅमेरा आहे जो Samsung GW1 सेन्सर आहे. प्रायमरी कॅमेरा सेन्सरसह 8MP चा अल्ट्रा-वाईड कॅमेरा आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा मिळतो. रेडमीच्या या फोनमध्ये सेल्फीसाठी 8MP चा फ्रंट कॅमेरा आहे. यातील 5,080mAh ची बॅटरी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here