1-2 नव्हे तर ‘हे’ पाच फोन्स देत आहेत 20 हजारांच्या बजेटमध्ये 108MP चा शानदार कॅमेरा, पाहा यादी

स्मार्टफोन विकत घेताना कॅमेऱ्याचा जास्त विचार केला जातो. ग्राहकांना चांगला कॅमेरा असलेला स्मार्टफोन हवा असतो. जास्त मेगापिक्सल म्हणजे जास्त चांगला कॅमेरा नव्हे, हे जरी खरं असलं तरी जास्त रिजोल्यूशनचे फायदे देखील आहेत. त्यामुळे तुम्ही देखील 108MP चा हाय रिजोल्यूशन असलेला कॅमेरा फोन शोधत असाल आणि बजेट कमी असेल तर चिंता नसावी. आज आम्ही तुम्हाला भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या स्मार्टफोन्सची माहिती देणार आहोत ज्यांची किंमत 20,000 रुपयांपेक्षा कमी आहे आणि ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा मिळतो.

20 हजारांच्या बजेटमधील 108MP चा कॅमेरा असलेले फोन्स

Xiaomi Redmi Note 11 Pro Plus 5G

किंमत: 19,999 रुपये

Redmi Note 11 Pro+ 5G स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. शाओमीचा हा फोन Snapdragon 695 प्रोसेसरसह येतो. फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर देण्यात आला आहे. Redmi Note 11 Pro+ स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात प्रायमरी कॅमेरा म्हणून 108MP चा Samsung HM2 सेन्सर मिळतो. जोडीला 8MP ची अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो. तसेच 5000mAh ची बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.

Motorola Edge 20 Fusion

किंमत: 19,999 रुपये

Motorola Edge 20 Fusion स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा OLED डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. मोटोरोलाच्या Edge 20 Fusion फोनमध्ये MediaTek Dimensity 800U प्रोसेसरची पावर आहे. हा फोन 5000mAh ची बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 108MP च्या प्रायमरी कॅमेऱ्यासह 8MP च्या अल्ट्रा वाइड सेन्सर आणि 2MP च्या डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Realme 9

किंमत: 16,999 रुपये

Realme 9 स्मार्टफोन 90Hz रिफ्रेश रेट असलेला 6.4-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 लेयर प्रोटेक्शनसह येतो, ज्यात पंच होल कटआउट मिळते. रियलमीच्या या फोनमध्ये Qualcomm चा Snapdragon 680 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करणारी 5,000mAh ची बॅटरी आहे. रियलमी 9 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा Samsung ISOCELL HM6 सेन्सर आहे, त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रा वाइड लेन्स आणि 2MP ची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP चा फ्रंट कॅमेरा मिळतो.

Moto G60

किंमत: 14,999 रुपये

Moto G60 स्मार्टफोनमध्ये 6.8-इंचाचा FHD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz आहे. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 732G SoC प्रोसेसर मिळतो. मोटोरोलाच्या या फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी 20W फास्ट चार्जिंगसह देण्यात आली आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. फोनचा प्रायमरी कॅमेरा 108MP चा सेन्सर आहे, सोबत 8MP ची अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. फोनमध्ये 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळतो.

Infinix Note 12 Pro 5G

किंमत: 17,999 रुपये

Infinix Note 12 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.7-इंचाचा Full-HD+ अ‍ॅमोलेड डिस्प्ले मिळतो. प्रोसेसिंग पावरसाठी मीडियाटेकचा Dimensity 810 5G चिपसेट मिळतो. फोनमध्ये 5000mAh च्या बॅटरीसह 33W फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजी मिळते. Infinix Note 12 5G स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. ज्यात 108MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जोडीला 2MP चा अल्ट्रा वाइड आणि एक AI लेन्स आहे. इनफिनिक्सच्या या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here