1,000 KM रेंज, सोलर चार्जिंगसह येणारी ‘ही’ बॅटरी कार आहे अनोखी, जाणून घ्या थक्क करणारे फीचर्स

जग जरी इलेक्ट्रिक व्हेइकल्सकडे वळत असलं तरी त्यांची एक कमजोर बाजू म्हणजे मिळणारी कमी रेंज. इलेक्ट्रिक वाहने सिंगल चार्जमध्ये जास्त अंतर पार करू शकत नाहीत आणि जरी जास्त रेंज असलेली इलेक्ट्रिक वाहने आली तरी त्यांचा चार्जिंग टाइम देखील तितकाच जास्त असतो. चार्जिंग स्टेशन्सचा न झालेला विस्तार देखील बॅटरी असलेल्या गाड्यांसाठी एक अडचण आहे. यावर उपाय म्हणून सौरऊर्जेवर चालणाऱ्या कार्सचा विचार तुम्ही देखील केला असेल. आता अशी एक कार रस्त्यावर येत आहे.

ही इलेक्ट्रिक कार फक्त सूर्याच्या प्रकाशात चार्ज होत नाही तर हिची डिजाईन देखील दिलखेचक आहे. Aptera vehicle नं एक अशीच इलेक्ट्रिक कार सादर केली आहे जी सोलर पावरवर चालते आणि लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी यात बॅटरी देखील देण्यात आली आहे. तसेच जेव्हा ही कार रस्त्यावर धावेल तेव्हा कितीही गर्दी असली तरी लोकांच्या नजारा याच कारकडे वळतील. सर्वात मोठी बाब म्हणजे सर्व कार्समध्ये चार चाकी असतात परंतु या कारमध्ये फक्त तीन टायर्स दिसतील. दोन पुढे आणि एक मागे.

Aptera च्या या इलेक्ट्रिक कारमध्ये पुढील चाकाकडे सोलर पॅनल लावण्यात आला जो कारला फिरण्यासाठी पुरेशी ऊर्जा मिळवून देतो. सोलरच्या माध्यमातूनच ही कार इतकी ऊर्जा मिळते जी गॅस आणि फ्यूलवर चालणाऱ्या पारंपरिक कार्सना चांगली टक्कर देते. कंपनीचा दावा आहे की कारची सोलर बॅटरी जी अतिरिक्त पावर देते तिच्या मदतीनं रोज कमीत कमी 40 किलोमीटर जास्त मायलेज मिळतो.

Aptera कारमध्ये फक्त सौर ऊर्जेचा सोर्स म्हणून वापर केला जात नाही तर लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी तुम्ही बॅटरी पॅकची मदत घेऊ शकता. ज्याचा वापर तुम्ही सामान्य बॅटरी असलेल्या कार प्रमाणे वापर करू शकाल. रोजच्या वापरासाठी जर तुम्ही बेस लेव्हल बॅटरी पॅकचा वापर केला तर तुम्हाला 250 किलोमीटरची रेंज मिळेल. तसेच जर तुम्ही अपग्रेडेड बॅटरी पॅक घेतला तर तुम्हाला 1,000 किलोमीटरचा प्रवास करता येईल.

Aptera ची ही इलेक्ट्रिक कार टेक्नॉलॉजीमध्ये इतकी स्मार्ट आहे की सोलरचा पुरेपूर वापर करण्यासाठी ही स्वतःला एका तंबूत रूपांतरित करते आणि एका चार्जिंग स्टेशनप्रमाणे बनते. अशाप्रकारे सोलर पॅनल दुप्पट ताकदीनं बॅटरी चार्ज करतो. इथे एक बाब लक्षात घेतली पाहिजे की Aptera ची ही बॅटरी असलेली कार सध्या फक्त अल्फा प्रोटोटाइप आहे आणि येत्या काळात हिचा बीटा प्रोटोटाइप येईल आणि त्यात मिळणारे फीचर्स अजून शानदार असतील. सर्वात खास बाब अशी की जेव्हा कार आपोआप टेंट बनते तेव्हा त्या कारमध्ये दोन लोकांना कॅम्प करता येईल इतकी जागा तयार होते.

Aptera सोलर कारची किंमत

इतकी माहिती जाणून घेतल्यानंतर तुम्हालाही Aptera च्या या सोलर कारची किंमत जाणून घ्यायची असेल. कंपनीनं 250 किलोमीटर रेंज असलेली कार 25,900 डॉलरमध्ये लिस्ट केली आहे जे भारतीय प्राईस नुसार जवळपास 21 लाख रुपये होतात. तर 1,000 किलोमीटरची रेंज असलेली Aptera सोलर कारची किंमत 57,000 डॉलर म्हणजे जवळपास 45 लाख रुपये आहे. सोलर पॅकसह तुम्हाला यात 40 किलोमीटर अतिरिक्त रेंज मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here